Old Smartphone Hack: फक्त १ ॲप डाऊनलोड करा आणि जुन्या स्मार्टफोनला बनवा CCTV कॅमेरा; घरबसल्या करा सुरक्षा, पैसेही वाचतील!

Published : Jun 29, 2026, 05:11 PM IST

घराच्या सुरक्षेसाठी महागडे CCTV कॅमेरे कशाला? तुमच्याकडे असलेला जुना, वापरात नसलेला स्मार्टफोनच आता तुमच्या घराचा पहारेकरी बनेल. यासाठी एकही पैसा खर्च करण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही जुन्या फोनलाच सीसीटीव्ही कॅमेरा बनवू शकता.  

PREV
14
Smart Phone to CC Camera
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. नवीन मॉडेल आलं की आपण जुना फोन बाजूला ठेवतो. पण तोच जुना फोन तुमच्या घराच्या सुरक्षेसाठी उपयोगी पडू शकतो. महागडा CCTV कॅमेरा विकत घेण्याऐवजी, काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमच्या जुन्या फोनलाच एक जबरदस्त सुरक्षा कॅमेरा बनवू शकता.
24
या स्टेप्स फॉलो करा...
सर्वात आधी तुमच्या जुन्या फोनमध्ये काही बदल करा. फोनमधील नको असलेले सर्व अॅप्स काढून टाका, जेणेकरून स्टोरेज मोकळं होईल. फोन स्लो चालत असेल तर त्याला फॅक्टरी रिसेट करा. त्यानंतर फोन वाय-फायला कनेक्ट करून त्याचा कॅमेरा, माइक आणि इंटरनेट व्यवस्थित काम करतंय की नाही, हे तपासा. यानंतर एक सिक्युरिटी कॅमेरा अॅप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. हे अॅप तुमच्या जुन्या आणि नवीन दोन्ही फोनवर इन्स्टॉल करा. दोन्ही फोनमध्ये एकाच युझर अकाउंटने लॉग इन करा. यामुळे जुना फोन कॅमेरा म्हणून काम करेल आणि तुम्ही तुमच्या नवीन फोनवरून कुठेही बसून लाइव्ह फुटेज पाहू शकाल.
34
कॅमेरा ठेवण्याची जागा...
चांगल्या सुरक्षेसाठी फोन योग्य ठिकाणी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फोन थोडा उंचीवर ठेवा, जेणेकरून मोठा एरिया कव्हर होईल. घराचा मुख्य दरवाजा, बाल्कनी किंवा जिथे तुम्हाला सुरक्षा गरजेची वाटते, तिथे हा फोन सेट करा. उंचीवर ठेवल्यास तुम्हाला संपूर्ण फुटेज पाहता येईल. हा फोन सतत चालू राहणार असल्यामुळे त्याची बॅटरी लवकर संपू शकते. त्यामुळे फोनला सतत चार्जिंग मिळेल अशी सोय करा. चार्जिंग पॉईंटजवळच फोन सेट करणे उत्तम.
44
मोशन डिटेक्शन फीचर वापरा..
अनेक सिक्युरिटी अॅप्समध्ये 'मोशन डिटेक्शन' नावाचं फीचर असतं. जेव्हा कॅमेऱ्यासमोर कोणतीही हालचाल होते, तेव्हाच हे फीचर रेकॉर्डिंग सुरू करतं. यामुळे फोनची स्टोरेज वाचते आणि फक्त महत्त्वाचं फुटेज रेकॉर्ड होतं. इतकंच नाही, तर व्हिडिओसोबत ऑडिओसुद्धा रेकॉर्ड होतो. घरात लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती एकटे असताना हे खूप उपयोगी ठरतं. जास्त स्टोरेजसाठी तुम्ही क्लाउड स्टोरेज अॅप्स वापरू शकता. यामुळे रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सुरक्षितपणे सेव्ह करता येतो. चांगलं इंटरनेट कनेक्शन असेल, तर तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हिडिओ फुटेज पाहू शकता.
Read more Photos on

Recommended Stories