Jyestha Purnima 2026: ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबत काही सोपे उपाय केले, तर घरात सुख-समृद्धी नांदते आणि पैशांची कधीच चणचण भासत नाही. जाणून घ्या हे खास उपाय.
सनातन धर्मात पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रद्धा आणि निष्ठेने केलेली पूजा, दान आणि काही खास उपाय केल्यास अनेक पटींनी पुण्यफळ मिळतं. २९ जून २०२६ रोजी, सोमवारी, ज्येष्ठ पौर्णिमेचा पवित्र सण आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. पत्रिकेत चंद्र कमजोर असेल तर काही सोपे उपाय नक्की करावेत.
27
चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देणे शुभ
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्येष्ठ पौर्णिमेच्या संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देणे शुभ मानले जाते. ज्यांच्या पत्रिकेत चंद्र कमजोर आहे, त्यांच्यासाठी हा उपाय विशेष फायदेशीर आहे. असे केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
37
चंद्रदेवाला पाणी, दूध, धूप, दीप आणि पांढरी फुले अर्पण करा
जर तुम्हाला अशांत किंवा तणावग्रस्त वाटत असेल, तर चंद्रदेवाला पाणी, दूध, धूप, दीप आणि पांढरी फुले अर्पण करा. असे केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक विचार वाढतात.
पौर्णिमेच्या रात्री चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवणे देखील शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या प्रथेमुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरात सुख-शांती येते.
57
कपडे, चपला, बूट, छत्र्या आणि आंब्यासारखी हंगामी फळे करा दान
या दिवशी गरजूंना कपडे, चपला, बूट, छत्र्या आणि आंब्यासारखी हंगामी फळे दान करणे हे एक पुण्यकर्म मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दान केल्याने शुभ फळ मिळते आणि जीवनात समृद्धीचा मार्ग खुला होतो.
67
भगवान शंकराची पूजा
ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. त्यात हा दिवस सोमवारी आल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि तांदूळ अर्पण केल्यास शुभ फळ मिळते.
77
सात्त्विक आहार घ्यावा
ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सात्त्विक आहार घ्यावा. या दिवशी तामसिक अन्न, तसेच कांदा आणि लसूण खाणे टाळणे चांगले मानले जाते.