Earphone Hacks : खिशात इयरफोनच्या वायरचा गुंता होतोय? मग या सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा

Published : Sep 26, 2026, 05:32 PM IST

खिशात ठेवलेल्या इयरफोनच्या वायरचा गुंता होणे ही आपल्या सर्वांचीच कॉमन समस्या आहे. या कटकटीतून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. तुम्ही या ट्रिक्स फॉलो केल्या, तर तुमचे इयरफोन्स कधीच गुंता होणार नाहीत.

PREV
15
इयरफोनच्या वायरचा गुंता झालाय?

सध्या ब्लूटूथ आणि इयरपॉड्सचा ट्रेंड असला, तरी अनेक जण अजूनही वायर वाले इयरफोन्स वापरतात. पण खिशात किंवा बॅगेत ठेवल्यावर या वायरचा भयंकर गुंता होतो. हा गुंता सोडवणे म्हणजे एक मोठी डोकेदुखीच असते. तुमच्या इयरफोनची वायर अशी गुंता होऊ नये म्हणून ती खिशात कशी ठेवावी, हे आपण इथे पाहणार आहोत.

25
टीप-१

तुम्ही इयरफोनची वायर दोन बोटांच्या मध्ये पकडून '८' च्या आकारात गुंडाळा. त्यानंतर मध्यभागी एका छोट्या दोऱ्याने किंवा बारीक वायरने बांधून ठेवा. असे केल्याने वायरचा अजिबात गुंता होणार नाही. तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ते सहज काढून वापरू शकता.

35
टीप-२

इयरफोन्स हाताला बँड बांधल्यासारखे गोल गुंडाळा. शेवटी एका रबर बँडने किंवा दोऱ्याने गाठ मारा. तुमच्या इयरफोनची वायर खूप लांब असेल, तर हवी तेवढी सोडून उरलेला भाग रबर बँडने गुंडाळून ठेवा. या ट्रिकमुळे वायरचा गुंता होत नाही.

45
टीप-३

तुमच्याकडे रबर बँड किंवा दोरा नसेल, तर इयरफोनची वायर थेट तुमच्या मोबाईलभोवतीच गुंडाळा. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. वायर खूप घट्ट ओढून गुंडाळू नका. असे केल्यास वायर खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे ती हळूवार आणि सैलसर गुंडाळा.

55
टीप-४

ऑफिसमध्ये फाईल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या बाइंडर क्लिप्सचा वापर तुम्ही इयरफोन्स गुंडाळण्यासाठी करू शकता. विशेषतः प्रवासात याचा खूप फायदा होतो. तसेच तुमच्याकडे जुने, बंद पडलेले एटीएम कार्ड असेल, तर ते मधून कापून त्याला इयरफोनची वायर गुंडाळून तुम्ही ती सुरक्षित ठेवू शकता.

Read more Photos on

Recommended Stories