Value of Bikes : भारतीय ग्राहक नवी बाईक घेताना गाडीची किंमत आणि मायलेजसोबतच तिच्या रिसेल व्हॅल्यूचाही विचार करतात. भविष्यात नवी बाईक घेताना जुन्या गाडीला चांगली किंमत मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते.
कोणतीही टू-व्हीलर खरेदी करताना बहुतेक लोक आधी किंमत आणि मायलेज पाहतात. पण काही वर्षांनी गाडी विकायची झाल्यास किती किंमत मिळेल, हेही महत्त्वाचं आहे. चांगली रिसेल व्हॅल्यू असलेली बाईक किंवा स्कूटर भविष्यात तुम्हाला चांगला परतावा देते. जास्त काळ टिकणाऱ्या आणि विश्वसनीय गाड्यांना सेकंड हँड मार्केटमध्ये मोठी मागणी असते.
25
हिरो स्प्लेंडर आणि होंडा ॲक्टिव्हा
हिरो स्प्लेंडर ही भारतातील सर्वात विश्वासार्ह बाईकपैकी एक आहे. तिचं इंजिन साधं असल्यामुळे जास्त खर्च न करता गाडी वर्षानुवर्षे टिकते. त्यामुळेच २-३ वर्षांनंतरही या बाईकला चांगली किंमत मिळते. तर, होंडा ॲक्टिव्हा हे स्कूटर सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय मॉडेल आहे. स्मूथ रायडिंग आणि सोप्या वापरामुळे ही गाडी सर्व वयोगटातील लोकांना आवडते. शहरांमध्ये सेकंड हँड मार्केटमध्ये या स्कूटरला मोठी मागणी आहे.
35
होंडा शाईन आणि पल्सर १५०
ज्यांना थोडी जास्त पॉवर आणि फीचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी होंडा शाईन एक चांगला पर्याय आहे. ही बाईक 125cc सेगमेंटमध्ये दमदार परफॉर्मन्स आणि स्मूथ रायडिंगसाठी ओळखली जाते. जास्त काळ वापरल्यानंतरही ही गाडी चांगली रिसेल व्हॅल्यू देते. तर, बजाज पल्सर 150 तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिनमुळे सेकंड हँड मार्केटमध्येही ही बाईक आकर्षक ठरते. त्यामुळे तिची किंमत लवकर कमी होत नाही.
45
रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही फक्त एक सामान्य बाईक नाही, तर अनेकांसाठी ते एक फिलिंग आहे. तिचं रेट्रो डिझाइन आणि खास साउंड तिला एक वेगळी ओळख देतो. या बाईकची किंमत जास्त असली तरी, वापरल्यानंतरही तिची व्हॅल्यू लवकर कमी होत नाही. काही वेळा तर जुन्या मॉडेल्सना जास्त मागणी असते.
55
मग कोणती टू-व्हीलर खरेदी करावी?
कमी बजेटमध्ये गाडी घेऊन विकताना जास्त नुकसान टाळायचं असेल, तर हिरो स्प्लेंडर आणि होंडा ॲक्टिव्हा हे सुरक्षित पर्याय आहेत. चांगला परफॉर्मन्स आणि चांगली किंमत दोन्ही हवं असेल, तर होंडा शाईन आणि पल्सर 150 चांगले पर्याय आहेत. पण जर तुम्हाला एक खास अनुभव आणि प्रीमियम फिलिंग हवी असेल, तर रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 तुमच्यासाठी योग्य निवड ठरू शकते.