
Top 5 CNG Cars in India for Best Mileage and Savings : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच हैराण झाले आहेत. तुम्ही जर नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर CNG गाड्या तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. भारतीय बाजारात अशा अनेक CNG गाड्या आहेत, ज्या कमी खर्चात जबरदस्त मायलेज देतात. चला, अशाच टॉप 5 CNG गाड्यांबद्दल जाणून घेऊया.
मारुती सुझुकी स्विफ्ट CNG
मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीयांची एक आवडती गाडी आहे. कंपनीने आता या गाडीचं CNG व्हेरिएंटही बाजारात आणलं आहे. याची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीच्या दाव्यानुसार, स्विफ्ट CNG एका किलो गॅसमध्ये 32.85 किलोमीटरचं मायलेज देते.
मारुती सुझुकी वॅगनआर CNG
सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक म्हणजे मारुती सुझुकी वॅगनआर. या गाडीचं CNG मॉडेलही खूप लोकप्रिय आहे. वॅगनआर CNG जवळपास 33.47 किलोमीटर प्रति किलो इतकं मायलेज देते. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 6.49 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी एस-प्रेसो CNG
तुम्ही जर नवीन CNG गाडी घेण्याच्या विचारात असाल, तर मारुती सुझुकी एस-प्रेसो CNG हा एक चांगला पर्याय आहे. हे मॉडेल एका किलो CNG मध्ये सुमारे 32.73 किलोमीटरचं मायलेज देतं. भारतीय बाजारात या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकी अल्टो K10 CNG
कमी किमतीत जास्त मायलेज देणारी CNG गाडी हवी असेल, तर मारुती सुझुकी अल्टो K10 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. अल्टो K10 च्या CNG व्हेरिएंटची किंमत 5.78 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ही गाडी एका किलो CNG मध्ये 33.85 किलोमीटरचं मायलेज देते.
मारुती सुझुकी सेलेरियो CNG
खिशाला परवडणाऱ्या आणि दमदार मायलेज देणाऱ्या गाड्यांमध्ये मारुती सुझुकी सेलेरियो CNG चाही समावेश होतो. ही गाडी एका किलो CNG मध्ये 34.43 किलोमीटरचं मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. मारुती सुझुकी सेलेरियो CNG ची किंमत 6.79 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, भारत) सुरू होते.