Top 125cc Bikes in India Under 1 Lakh : भारतात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम 125cc बाईक्स स्टाईल, मायलेज आणि पॉवर यांचा उत्तम मिलाफ देतात. चला, आघाडीच्या मॉडेल्सची वैशिष्ट्ये आणि किंमती पाहूया.
भारतातील 125cc सेगमेंट म्हणजे मायलेज आणि पॉवरचा योग्य बॅलन्स. रोजच्या प्रवासासाठी आणि छोट्या राईडसाठी या बाईक्स 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात. स्पोर्टी लूक आणि आधुनिक फीचर्समुळे त्या तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत.
25
हिरो एक्सट्रीम 125R
हिरो एक्सट्रीम 125R ही एक स्टायलिश बाईक आहे. तिचे 125cc इंजिन 11.4hp पॉवर आणि 10.5Nm टॉर्क देते. किंमत सुमारे 89,000 रुपये आहे. आकर्षक डिझाइन आणि उत्तम मायलेजमुळे ही तरुणांसाठी परफेक्ट आहे.
35
होंडा एसपी 125
होंडा एसपी 125 ही रोजच्या वापरासाठी आणि मायलेजसाठी उत्तम आहे. 123.94cc इंजिन 10.72hp पॉवर देते. किंमत 85,815 रुपये आहे. ही बाईक सुमारे 63 किमी/लिटर मायलेज देते आणि तिचा मेन्टेनन्स खर्च कमी आहे.
बजाज पल्सर 125 ही एक स्पोर्टी बाईक आहे. तिची किंमत 79,048 रुपये आहे. तर नवीन पल्सर N125 ची किंमत 91,692 रुपये आहे. स्टायलिश डिझाइन आणि LED हेडलाइटमुळे या बाईक्स आकर्षक दिसतात.
55
टीव्हीएस रायडर 125
TVS रायडर 125 तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 124.8cc इंजिन 11.22hp पॉवर देते. किंमत 80,500 रुपयांपासून सुरू होते. स्मार्ट डिजिटल क्लस्टर आणि आरामदायक रायडिंगमुळे ही एक उत्तम निवड आहे.