New FASTag Rules: हायवेने प्रवास करताय? सावधान! 10 एप्रिलपासून बदलतोय टोलचा नियम; 'कॅश' देणाऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका!

Published : Apr 05, 2026, 04:15 PM IST

New FASTag Rules: 10 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नियमात मोठे बदल होत आहेत. FASTag अनिवार्य होणार असून, FASTag शिवाय UPI ने पेमेंट केल्यास २५% अतिरिक्त शुल्क लागेल. भविष्यात GPS-आधारित टोल प्रणाली लागू करण्याचीही सरकारची योजना आहे.

PREV
16
हायवेने प्रवास करताय? सावधान! 10 एप्रिलपासून बदलतोय टोलचा नियम

नवी दिल्ली: जर तुम्ही स्वतःच्या कारने वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्या खिशावर थेट परिणाम करणारी आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने टोल वसुली अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी 'FASTag' च्या नियमात मोठी दरवाढ आणि बदल करण्याचे संकेत दिले आहेत. येत्या 10 एप्रिल 2026 पासून टोल प्लाझावरील चित्र पूर्णपणे बदललेले दिसेल. नेमकं काय बदलणार आहे? जाणून घ्या सविस्तर. 

26
1. कॅश पेमेंटला मिळणार 'दणका': यूपीआयने भरल्यास २५% अतिरिक्त भुर्दंड

सरकारने आता 'कॅशलेस' इंडियाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. 10 एप्रिलपासून टोल बूथवर रोख रकमेचा व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा मानस आहे. जर तुमच्याकडे FASTag नसेल आणि तुम्ही UPI (Google Pay, PhonePe) द्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला मूळ टोल दरापेक्षा तब्बल 25 टक्के जास्त रक्कम मोजावी लागेल. थोडक्यात, विना-फास्टॅग प्रवास आता तुम्हाला चांगलाच महाग पडणार आहे. 

36
2. 'फास्टॅग' आता पर्याय नाही, तर सक्ती!

आतापर्यंत काही टोल नाक्यांवर कॅश लेन उपलब्ध असायची, मात्र नव्या नियमानुसार प्रत्येक वाहनावर FASTag असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. रेडिओ फ्रीक्वेंसी सेन्सरच्या मदतीने गाडी टोल नाक्यावर पोहोचताच सेकंदात पैसे कट होतील, ज्यामुळे रांगांमध्ये उभे राहण्याची कटकट संपणार आहे. 

46
3. पर्यावरणाचे रक्षण आणि वेळेची बचत

NHAI (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) च्या मते, हा नियम लागू केल्याने खालील फायदे होतील.

वाहतूक कोंडीतून मुक्ती: व्यस्त वेळेत टोल नाक्यांवर गाड्यांच्या रांगा लागणार नाहीत.

इंधनाची बचत: वारंवार थांबणे आणि गाडी सुरू करणे बंद झाल्याने इंधन वाचेल.

प्रदूषणात घट: वाहनांच्या उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणाला हातभार लागेल. 

56
भविष्यात टोल नाकेही गायब होणार?

सरकारचे व्हिजन फक्त फास्टॅगपुरते मर्यादित नाही. लवकरच देशात GPS-बेस्ड आणि ANPR (Automatic Number Plate Recognition) सिस्टम लागू होणार आहे.

कसे काम करेल? हाय-टेक कॅमेरे तुमच्या गाडीची नंबर प्लेट स्कॅन करतील.

फायदा: तुम्ही महामार्गावर जितके अंतर कापले, तितकेच पैसे तुमच्या खात्यातून कट होतील. यामुळे भविष्यात टोल गेटवर गाडी थांबवण्याची गरजही उरणार नाही. 

66
महत्त्वाची सूचना

प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या FASTag मध्ये पुरेसा बॅलन्स असल्याची खात्री करा, अन्यथा ऐनवेळी २५% जादा टोल भरण्याची वेळ येऊ शकते.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories