Soft Chapati : धावपळीच्या जीवनशैलीमुळे रात्रीच चपातीचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणे सामान्य झाले आहे. रात्री ठेवलेल्या पिठाच्या चपात्याही जास्त वेळ मऊ आणि लुसलुशीत राहतात.
Soft Chapati : आजकाल कोणाकडेच वेळ नाही. त्यामुळे मोकळ्या वेळेतच स्वयंपाकाची तयारी केली जाते. काहीजण सकाळी न करता रात्रीच चपातीचे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने चपाती कडक होते.
25
चपाती खूप वेळ मऊ -
Soft Chapati : रात्री पीठ मळताना काही गोष्टी घातल्यास चपाती खूप वेळ मऊ राहते. यामुळे दुपारच्या जेवणाच्या डब्याची चिंता मिटेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशा चपात्या आवडतात.
35
काय घालावे?
Soft Chapati : चपातीचे पीठ मळताना त्यात एक कप गरम दूध घालावे. यामुळे चपाती मऊ राहण्यास मदत होते. रात्री पीठ मळून ठेवले तरी सकाळी केलेल्या चपात्या मऊ आणि लुसलुशीत होतात. यामुळे वेळेचीही बचत होते.
Soft Chapati : काहीजण चपातीचे पीठ मळताना तेल आणि तुपाचा वापर करतात. चपाती बनवण्याच्या किमान ३० मिनिटे आधी पीठ मळून ठेवणे चांगले मानले जाते. पीठ जितके जास्त मुरेल, तितकी चपाती चविष्ट आणि मऊ होते.