NHAI on FASTag : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगच्या नियमांमध्ये एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. ही वाहनचालकांसाठी एक चांगली बातमी आहे. यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे.
NHAI ने फास्टॅग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. 1 फेब्रुवारीपासून कार, जीप आणि व्हॅनसाठी KYV पडताळणीची गरज नाही. यामुळे टॅग खरेदीनंतर होणारा विलंब आणि त्रास कमी होईल.
24
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -
योग्य कागदपत्रे असूनही, वाहन मालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही प्रक्रिया वेळखाऊ होती. आता NHAI ने बदल केला असून, बँका टॅग देण्यापूर्वीच पडताळणी पूर्ण करतील.
34
फास्टॅगमधील बदल -
KYV हे बनावट टॅग शोधण्यासाठी होते, पण ते त्रासदायक ठरले. आता नवीन नियमांनुसार, बँका टॅग देण्यापूर्वीच 'वाहन' डेटाबेसद्वारे वाहनाचे तपशील तपासतील. हे बंधनकारक आहे.
'वाहन'वर माहिती नसल्यास RC वरून पडताळणी होईल. टॅग सक्रिय झाल्यावर KYV ची गरज नाही. जुन्या फास्टॅगधारकांनाही नियमित KYV ची गरज नाही. यामुळे प्रक्रिया सोपी आणि जलद होईल.