
Three New Electric Cars Launching In India By April 2026 : 2026 हे वर्ष हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्यांचं (EV) असणार आहे. या सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच तीन नवीन ईव्ही शोरूममध्ये दाखल होतील. यात मर्सिडीज CLA EV सेडान, टोयोटा अर्बन क्रूझर एबेला EV मिड-साईज SUV आणि विनफास्ट लिमो ग्रीन थ्री-रो MPV या गाड्यांचा समावेश आहे. जर तुम्ही लवकरच नवीन ईव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर या येणाऱ्या मॉडेल्सवर एक नजर टाकणं महत्त्वाचं आहे. चला, या नवीन ईव्हीबद्दल जाणून घेऊया.
या नवीन एबेला ईव्हीची बुकिंग्स आधीच सुरू झाली आहेत. ही गाडी म्हणजे मारुती eVitara चं टोयोटा व्हर्जन आहे. ही गाडी E1, E2 आणि E3 अशा तीन व्हेरिएंटमध्ये येईल. E1 व्हेरिएंटमध्ये 49-kWh बॅटरीसोबत 144-bhp ची इलेक्ट्रिक मोटर असेल. तर E2 आणि E3 व्हेरिएंटमध्ये 61-kWh बॅटरीसोबत 174-bhp ची इलेक्ट्रिक मोटर मिळेल. कंपनीचा दावा आहे की, लहान बॅटरीवर ही गाडी 440 किलोमीटर आणि मोठ्या बॅटरीवर 543 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.
मर्सिडीज-बेंझने कन्फर्म केलं आहे की, CLA 250+ लाँग रेंज व्हेरिएंटची डिलिव्हरी एप्रिलमध्ये सुरू होईल. तर CLA 200 स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट ग्राहकांना जून 2026 मध्ये मिळेल. या इलेक्ट्रिक सेडानमध्ये 85 kWh ची बॅटरी दिली आहे. WLTP सायकलनुसार ही गाडी 729 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे. स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट एका चार्जमध्ये 542 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल. 240 kWh च्या डीसी फास्ट चार्जरने मर्सिडीज CLA EV फक्त 20 मिनिटांत जवळपास 400 किलोमीटरपर्यंत चार्ज होऊ शकते.
विनफास्ट भारतात आपली तिसरी इलेक्ट्रिक कार 'लिमो ग्रीन' लाँच करत आहे. ही थ्री-सीटर MPV वैयक्तिक ग्राहक आणि फ्लीट ऑपरेटर्स (उदा. टॅक्सी कंपन्या) या दोघांनाही डोळ्यासमोर ठेवून बनवली आहे. ग्लोबल व्हेरिएंटप्रमाणेच, भारतात येणाऱ्या विनफास्ट लिमो ग्रीनमध्येही 60.13 kWh बॅटरी पॅकसोबत एक इलेक्ट्रिक मोटर असेल. हे सेटअप 204 bhp पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करतं. ही गाडी (NEDC नुसार) 450 किलोमीटरची रेंज देईल.