Lion vs Hyena: जंगलाचा राजा सिंह झेब्रा, हरणासारख्या प्राण्यांची शिकार करून खातो. पण तुम्हाला माहिती आहे का, की सिंह तरसाला मारतो, पण त्याचं मांस खात नाही? या दोन कट्टर शत्रूंमधील संघर्षामागे एक रंजक कारण दडलंय. चला, जाणून घेऊया.
जंगलात सिंह आणि तरस (Hyena) यांच्यातलं वैर खूप जुनं आहे. दोघेही एकाच प्रकारच्या अन्नासाठी नेहमीच स्पर्धा करतात. पण एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, सिंह तरसांना मारतात, पण त्यांचं मांस सहसा खात नाहीत. याउलट, तरसाला संधी मिळाली तर तो सिंहाचं हाडसुद्धा शिल्लक ठेवत नाही!
26
सिंह तरसाला का खात नाही?
याचं मुख्य कारण म्हणजे तरसाच्या मांसाचा प्रकार. तरसाचं मांस खूपच चिवट असतं आणि त्याला एक विचित्र दुर्गंध येतो. त्यामुळे सिंहांना ते मांस अजिबात आवडत नाही.
36
सिंहाचं आवडतं जेवण
सिंह नेहमी पौष्टिक आणि सहज पचणारं मांस खाणं पसंत करतात. झेब्रा, हरीण आणि रानगवा यांसारख्या शाकाहारी प्राण्यांचं मांस सिंहांसाठी सर्वात आवडतं अन्न आहे.
तरस हे सफाई कामगार (Scavengers) म्हणून ओळखले जातात. ते मिळेल ते कुजलेलं मांस खातात. अशा मांसाहारी प्राण्याचं मांस सिंहासारख्या मोठ्या शिकाऱ्याला खाण्यायोग्य वाटत नाही.
56
तरस सिंहाला का खातो?
तरस हे संधीसाधू प्राणी आहेत. भूक लागल्यावर ते काहीही खाऊ शकतात. त्यांची पचनसंस्था इतकी मजबूत असते की ती कठीण हाडंही सहज वितळवू शकते. त्यामुळे सिंहाचं मृत शरीर जरी सापडलं, तरी ते त्याला आपलं अन्न बनवतात.
66
न खाता मारण्याचं कारण काय?
ही लढाई फक्त अन्नासाठी नाही, तर आपल्या प्रदेशावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी असते. तरस अनेकदा सिंहांनी शिकार केलेलं अन्न चोरतात. हा त्रास टाळण्यासाठी आणि आपला अन्नस्रोत वाचवण्यासाठी सिंह तरसांना ठार मारतात. थोडक्यात सांगायचं तर, हे फक्त भुकेचं प्रकरण नाही, तर जगण्यासाठीचं एक 'रणनीतिक युद्ध' आहे.