पाणी, सुर्यप्रकाश असो वा नसो, हे 10 प्लांट्स कधीही वाळणार नाहीत, फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त

Published : Jun 07, 2025, 12:00 PM IST
पाणी, सुर्यप्रकाश असो वा नसो, हे 10 प्लांट्स कधीही वाळणार नाहीत, फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त

सार

हिरवे प्लांट्स घरात चैतन्य आणि उर्जा आणण्याचा एक सोपा मार्ग आहेत. खिडकीवर लटकणार्या वेली असोत किंवा कोपरा सजवणारे उंच झाड असो. येथे काही उत्तम इंडोर प्लांट्सबद्दल जाणून घ्या जे सांभाळणे खूप सोपे आहे.

मुंबई : घरातली झाडे सर्वांनाच आवडतात. घराची शोभा आणि उर्जा झाडे वेगळ्याच पातळीवर नेतात. पण जेव्हा आपण ती लावतो आणि ती वाळतात तेव्हा मन खूप दुःखी होते. पुन्हा ती लावण्याचा प्रयत्न करत नाही. पण आम्ही इथे तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत ज्यांना सांभाळणे खूप सोपे आहे. ज्यांना आठवड्यातून किंवा १५ दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते.

१. स्नेक प्लांट

स्नेक प्लांटला “मदर-इन-लॉ टंग” असेही म्हणतात. या झाडाला आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे लागते. कमी प्रकाशातही ते चांगले वाढते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. हे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडते. घरातील हवा शुद्ध होते.

२. झी झी प्लांट

काळोख्या खोलीसाठी झी झी प्लांट हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे प्लांट अनेक महिने पाण्याशिवाय राहू शकते. ड्रॉईंग रूम किंवा ऑफिस डेस्कसाठी हे उत्तम आहे.

३. मनी प्लांट

भारतीय घरांमध्ये सर्वात लोकप्रिय झाड आहे हे. हे घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी लावता येते. कमी उन्हात हे झपाट्याने वाढते. पानांवर पाणी शिंपडणे पुरेसे आहे. आठवड्यातून एकदा मुळात पाणी घाला.

४. एलोवेरा

आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी एलोवेरा फायदेशीर आहे. हे लावून जर तुम्ही पाणी घालायला विसरलात तरी ते जगते. याला जास्त पाणी द्यायची गरज नाही. नैसर्गिक हवा शुद्ध करणारे झाड.

५. रबर प्लांट

लिविंग रूममध्ये ठेवण्यासाठी रबर प्लांट हा एक उत्तम पर्याय आहे. मोठी पाने घरात राजेशाही लूक देतात. खूप कमी देखभालीत वर्षानुवर्षे टिकते.

६. स्पायडर प्लांट

हवेतील कार्बन मोनोऑक्साइड काढून टाकण्याचे काम स्पायडर प्लांट करते. झाडूसारख्या पानांनी युक्त हे झाड अतिशय आकर्षक दिसते. मुले आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आहे. यालाही खूप कमी पाणी द्यावे लागते.

७. पीस लिली

पांढऱ्या फुलांचे सुंदर झाड खोलीत लावता येते. हे घराच्या सजावटीत भर घालते. आठवड्यातून एकदा पाणी देणे पुरेसे आहे.

८. कॅक्टस

कोरड्या आणि उष्ण वातावरणातही कॅक्टस जिवंत राहतो. हे दिसायला सर्वात वेगळे असते. मात्र प्राणी आणि मुलांपासून ते दूर ठेवा. यात काटे असतात.

९. सक्युलंट्स

लहान आणि गोंडस झाडांची आवड असेल तर सक्युलंट्स घरी नक्की लावा. यांच्या पानांमध्ये पाणी साठवले जाते. म्हणून जर तुम्ही १५ दिवस पाणी दिले नाही तरी ते जगते.

१०. पोथोस / डेव्हिल्स आयव्ही

लटकणाऱ्या कुंड्यांसाठी पोथोस उत्तम आहे. हे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवता येते. हे हवा शुद्धीकरण यंत्र म्हणून काम करते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
दमदार Toyota Hilux ला 5 स्टार सेफ्टी रेटिंग, वाचा पिक-अप ट्रकचा 89 टक्के स्कोअर कसा आला!