Tatkaal Passport Scheme : तत्काळमध्ये असा काढा पासपोर्ट, वाचा अर्जाच्या प्रक्रियेसह संपूर्ण माहिती सविस्तर

Published : Jun 26, 2026, 04:00 PM IST
Tatkaal Password

सार

बऱ्याचदा अर्जेंटमध्ये पासपोर्ट काढण्यासाठी बहुतांशजण तत्काळ पासपोर्ट काढतात. पण यासाठी काही कागदपत्रे द्यावी लागतात. अशातच तत्काळ पासपोर्टसाठी कोणते कागदपत्रे द्यावी, अर्जाची प्रक्रिया काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Tatkaal Passport Scheme : परदेशात नोकरी, शिक्षण, उपचार, व्यवसाय किंवा अन्य कोणत्याही तातडीच्या कारणासाठी पासपोर्टची गरज भासल्यास आता काळजी करू नका. कारण केंद्र सरकारच्या तत्काळ पासपोर्ट योजनेअंतर्गत नागरिकांना कमी कालावधीत पासपोर्ट मिळणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि नियमांची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

तत्काळ पासपोर्ट योजना म्हणजे काय?

पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (Regional Passport Office, Pune) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांना अत्यंत कमी वेळेत पासपोर्टची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी ही विशेष योजना सुरू केली आहे. परदेशात नोकरी, शिक्षण, वैद्यकीय उपचार, व्यवसाय किंवा तातडीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होतो.

तीन दिवसांत मिळणार पासपोर्ट

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या माहितीनुसार, अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे अचूक माहिती द्यावी. यानंतर पासपोर्ट सेवा केंद्राने अर्ज स्वीकारल्यानंतर अवघ्या कामकाजाच्या तीन दिवसांत पासपोर्ट जारी केला जाऊ शकतो. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत ही योजना कामी येणार आहे.

तत्काळ योजनेचा फायदा कसा मिळतो?

तत्काळ योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांना सामान्य अर्जांच्या तुलनेत लवकर अपॉइंटमेंट मिळते. या योजनेसाठी वेगळे प्राधान्य दिले जाते. यामुळे तत्काळ पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. तसेच अनेक प्रकरणांमध्ये प्रथम पासपोर्ट जारी केला जातो आणि त्यानंतर पोलिस पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे अर्जदारांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा अर्जातील त्रुटींमुळे अर्जाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे अर्ज भरताना सर्व नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Chanakya Niti: चाणक्यांनी आधीच सांगितलंय.... या मुलींपासून चार हात लांबच राहा!
Car Market: आरामदायी प्रवास होणार आणखी खास, Citroen ची नवीन Comfort Edition!