Tata Sierra Pre Booking : नवीन टाटा Sierra 15 डिसेंबरपासून अधिकृतपणे बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहे, तर काही शोरूममध्ये अनधिकृत बुकिंग ₹21,000 टोकनवर सुरू झाले आहे. टाटाच्या अधिकृत वेबसाइटवर फ्री प्री-बुकिंगची सुविधा दिली आहे.
टाटा मोटर्सची आयकॉनिक Sierra SUV आता पूर्णपणे नवीन अवतारात बाजारात दाखल होत असून, ग्राहकांमध्ये या गाडीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अधिकृत बुकिंग 15 डिसेंबरपासून सुरू होणार असले तरी, काही निवडक टाटा डीलरशिपने आधीच ₹21,000 टोकन रकमेवर प्री-बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नवीन Sierra साठी अनधिकृत बुकिंग प्रत्यक्षात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार ही अनधिकृत प्रक्रिया अनेक ठिकाणी सुरू झाल्याचे समोर आले आहे.
25
अधिकृत बुकिंग प्रक्रिया – कोणतेही शुल्क नाही
टाटाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे Sierra चे प्री-बुकिंग पूर्णपणे फ्री आहे. यासाठी ग्राहकांनी फक्त आपली मूलभूत माहिती जसे की, नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पिनकोड, शहर, राज्य आणि पॉवरट्रेन पर्याय — सबमिट करायची आहे. ही माहिती टाटा टीमपर्यंत पोहोचताच कंपनीचा प्रतिनिधी ग्राहकांशी थेट संपर्क साधून जवळच्या डीलरशिपकडे मार्गदर्शन करतो.
35
टाटा सिएरा – भारतातील किंमत आणि उपलब्ध वेरिएंट
नवीन Sierra SUV 7 variants मध्ये उपलब्ध आहे: Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+.
Accomplished आणि Accomplished+ या टॉप वेरिएंटची किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. उर्वरित मॉडेल्सची किंमत ₹11.49 लाख (ex-showroom) ते ₹18.49 लाख (ex-showroom) पर्यंत आहे. नवीन Sierra ची डिलिव्हरी 15 जानेवारीपासून ग्राहकांना मिळण्यास सुरुवात होणार आहे.