SUV Comparison: टाटा सिएरा की किया सेल्टॉस? बेस मॉडेलमध्ये कोण आहे खरा 'बॉस'? जाणून घ्या

Published : Apr 23, 2026, 03:02 PM IST
SUV Comparison

सार

SUV Comparison तुमचं बजेट ११-१२ लाखांच्या आसपास आहे आणि नवी SUV घ्यायचा विचार करताय? मग टाटा सिएरा आणि किया सेल्टॉसच्या बेस मॉडेल्समध्ये कन्फ्युज झाला असाल. सिएरामध्ये सेफ्टी आणि प्रीमियम डिझाइन मिळतं, तर सेल्टॉस मोठ्या टचस्क्रीन आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीमुळे केबिनमध्ये बाजी मारते. पाहूया कोण आहे बेस्ट.

तुम्ही नवी SUV घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट साधारण १० ते १२ लाखांच्या घरात असेल, तर टाटा सिएरा (Tata Sierra) आणि किया सेल्टॉस (Kia Seltos) यांची बेस मॉडेल्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. पण कमी पैशात जास्त फीचर्स कोणती गाडी देते, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर मग, या दोन्ही गाड्यांची तुलना करून पाहूया.

टाटा सिएराच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर किया सेल्टॉसच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १०.९९ लाख रुपये आहे. या दोन्ही एक्स-शोरूम किमती आहेत आणि शहरानुसार किंवा डीलरशिपनुसार ऑन-रोड किमती बदलू शकतात.

डिझाइन

टाटा सिएराचं 'स्मार्ट+' हे बेस मॉडेल दिसायला खूपच प्रीमियम वाटतं. यात बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेललाइट्स, ड्युअल-टोन रूफ आणि इलेक्ट्रिक ORVMs (साइड मिरर) मिळतात. इतकंच नाही, तर चारही चाकांना डिस्क ब्रेक आणि इलेक्ट्रिक टेलगेट रिलीजसारखे फीचर्सही यात आहेत. दुसरीकडे, किया सेल्टॉसच्या HTE मॉडेलमध्ये आइस क्यूब एलईडी हेडलॅम्प्स, एलईडी डीआरएल, स्टील व्हील्स, शार्क-फिन अँटेना आणि रिअर स्पॉयलर मिळतो. याचा लूक चांगला असला तरी, फीचर्सच्या बाबतीत सिएराच्या तुलनेत थोडं कमी प्रीमियम वाटतं.

इंजिन

टाटा सिएरामध्ये १.५ लीटर पेट्रोल (१०५ bhp) आणि १.५ लीटर डिझेल (११६ bhp) इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. किया सेल्टॉसमध्येही १.५ लीटर पेट्रोल (११३ bhp) आणि १.५ लीटर डिझेल (११४ bhp) इंजिन मिळतं. दोन्ही गाड्यांची पॉवर जवळपास सारखीच आहे. त्यामुळे तुम्हाला बेस मॉडेलमध्ये जास्त सेफ्टी आणि फीचर्स हवे असतील, तर टाटा सिएरा एक चांगला पर्याय आहे. पण जर तुम्हाला मोठी स्क्रीन, जास्त टेक्नॉलॉजी आणि ब्रँड व्हॅल्यू महत्त्वाची वाटत असेल, तर किया सेल्टॉसही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

सेफ्टी फीचर्स

सेफ्टीच्या बाबतीत टाटा सिएरा खूपच पुढे आहे. या गाडीत ६ एअरबॅग्ज, ESP (२० फंक्शन्ससह), चारही चाकांना डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, आयसोफिक्स (ISOFIX) आणि हिल असिस्टसारखे जबरदस्त फीचर्स मिळतात. याउलट, सेल्टॉसच्या HTE या बेस मॉडेलमध्ये फक्त २ एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल, की-लेस एन्ट्री आणि पार्किंग सेन्सर्ससारखे गरजेपुरते फीचर्स मिळतात. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत सिएरा स्पष्टपणे बाजी मारते.

केबिन आणि फीचर्स

सिएराच्या 'स्मार्ट+' मॉडेलचं केबिन जास्त मॉडर्न आणि प्रगत वाटतं. यात डिजिटल कॉकपिट, स्लायडिंग आर्मरेस्ट, मागच्या प्रवाशांसाठी सनशेड, रिअर एसी व्हेंट्स, ॲडजस्टेबल स्टिअरिंग आणि यूएसबी टाइप-सी (४५W) चार्जिंगची सोय आहे. याउलट, सेल्टॉसच्या HTE मॉडेलमध्ये १२-इंचाचा डिजिटल क्लस्टर, १०.२५ इंचाची मोठी टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, सहा स्पीकर आणि पॉवर विंडोज मिळतात. याचा अर्थ, टेक्नॉलॉजी आणि मनोरंजनाच्या बाबतीत सेल्टॉस जास्त स्ट्राँग आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Long-Range EVs: रेंजचं टेन्शन खल्लास! एका चार्जमध्ये 400km+ धावणाऱ्या 5 जबरदस्त इलेक्ट्रिक गाड्या
SUV Sales: एसयूव्ही बाजारात स्कॉर्पिओचाच दबदबा; विक्रीत सगळ्या गाड्यांना टाकलं मागे