
Tata Sierra 2025 Launch : टाटा सिएरा 25 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात लाँच झाली. निवडक टाटा डीलरशिप्सनी 11,000 ते 51,000 रुपयांच्या टोकन रकमेवर प्री-बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सिएरा सुरुवातीला आयसीई (अंतर्गत ज्वलन इंजिन) पॉवरट्रेनसह सादर केली जाईल, तर इलेक्ट्रिक आवृत्ती जानेवारी 2026 मध्ये शोरूममध्ये दाखल होईल. या कारच्या बेस मॉडेलची किंमत ११.४९ लाख ठेवण्यात आली आहे.
सिएराच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सेगमेंट-फर्स्ट ट्रिपल स्क्रीन सेटअप, ज्यामध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पुढच्या प्रवाशासाठी एक वेगळी स्क्रीन असेल. विशेष म्हणजे, डॉल्बी अॅटमॉस-ट्यून्ड ऑडिओ सिस्टीम देणारी ही या सेगमेंटमधील दुसरी कार असेल. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये यांचा समावेश आहे:
सिएरा एसयूव्ही सहा मोनोटोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल: बंगाल रूज (लाल), अंदमान अॅडव्हेंचर (पिवळा), मिंटेल ग्रे, प्रिस्टाइन व्हाइट, कुर्ग क्लाउड्स (सिल्व्हर/हलका ग्रे), आणि मुन्नार मिस्ट (हिरवा/ग्रे). लाँचच्या वेळी काळा रंग पर्याय किंवा विशेष ब्लॅक एडिशन उपलब्ध नसेल.
नवीन सिएरा एसयूव्हीमध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध असतील, ज्यात 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल यांचा समावेश आहे. NA पेट्रोल इंजिन 120 bhp पॉवर निर्माण करण्याची शक्यता आहे, तर टर्बो-पेट्रोल सुमारे 170 bhp पॉवर देईल. डिझेल मोटर 118 bhp पॉवर देईल.
टाटा 4 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या एसयूव्हीसाठी सीएनजी आणि हायब्रीड पॉवरट्रेन देण्याचाही विचार करत आहे. सिएरा ईव्ही आपली पॉवरट्रेन हॅरियर ईव्हीसोबत शेअर करेल अशी अपेक्षा आहे.