Tablet Offers: Amazon Great Summer Sale 2026 भारतात सुरू झाला आहे. या सेलमध्ये OnePlus, Xiaomi, Apple आणि Samsung च्या टॅबलेट्सवर जबरदस्त डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. काही मॉडेल्स तर आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत विकले जात आहेत.
Amazon Great Summer Sale 2026 भारतात अधिकृतपणे सुरू झाला आहे. या सेलमध्ये फक्त स्मार्टफोन्सवरच नाही, तर टॅबलेट्सवरही मोठ्या प्रमाणात सूट जाहीर झाली आहे. विशेषतः Apple, Samsung, Xiaomi, OnePlus आणि Lenovo कंपन्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
25
वनप्लस पॅड लाइटवर जबरदस्त डील
OnePlus Pad Lite आता १९,९९९ रुपयांऐवजी १६,९९९ रुपयांना मिळत आहे. जुनं डिव्हाइस एक्सचेंज केल्यास अतिरिक्त बोनसही मिळेल. ११-इंचाचा डिस्प्ले आणि ९३४०mAh बॅटरी असलेला हा टॅबलेट विद्यार्थी आणि OTT वापरणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय मानला जातो.
35
शाओमी पॅड ८ गेमिंग चाहत्यांच्या नजरेत
Xiaomi Pad 8 आता ४०,९९९ रुपयांऐवजी ३५,९९९ रुपयांना विकला जात आहे. Snapdragon 8s Gen 4 चिपसेट असलेला हा टॅबलेट गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम मानला जातो. मोठी बॅटरी आणि प्रीमियम डिस्प्ले ही याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
Apple iPad 11 आता ३३,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर Samsung Galaxy Tab A11+ २३,४९९ रुपयांना विकला जात आहे. इतकंच नाही, तर Galaxy Tab S11 मॉडेलवर २५,००० रुपयांपेक्षा जास्त सूट जाहीर झाली आहे. यामुळे प्रीमियम टॅबलेट मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे.
55
बँक ऑफर्स आणि अतिरिक्त बचत
HDFC बँक आणि Amazon Pay ICICI बँकेची कार्ड्स वापरणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त सूट आणि कॅशबॅक दिला जात आहे. नो-कॉस्ट EMI ची सोय असल्याने, हा Amazon Summer Sale अनेकांसाठी टॅबलेट खरेदी करण्याची उत्तम संधी ठरला आहे.