सर्वात आधी भारतीय संघ, जो T20 रँकिंगमध्ये नंबर वन आहे. संघात ८व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची ताकद आहे. गोलंदाजीत बुमराह आणि अर्शदीपसारखे हुकमी एक्के आहेत.
26
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श मधल्या फळीत धावा करतो. पण सलामी आणि टॉप ऑर्डरची चिंता आहे. कमिन्स आणि हेझलवूड नसल्याने वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली आहे.
36
इंग्लंड
इंग्लंडकडे फिल सॉल्ट, जोस बटलरसारखे स्फोटक फलंदाज आहेत. पण जोफ्रा आर्चर वगळता संघात कोणताही विश्वासार्ह वेगवान गोलंदाज नाही, ही संघाची मोठी अडचण आहे.
न्यूझीलंडकडे फिन ऍलन आणि टिम सायफर्टसारखे सलामीवीर आहेत. पण डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी संघासाठी चिंतेचा विषय आहे. गोलंदाज महागडे ठरत आहेत.
56
दक्षिण आफ्रिका
डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स गेम फिनिश करू शकतात. गोलंदाजीत रबाडा, नॉर्खियासारखे वर्ल्ड क्लास पेसर आहेत. पण संघात अनुभवाची कमतरता जाणवू शकते.
66
T20 वर्ल्ड कपमधील इतर दमदार संघ
याशिवाय पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघही स्पर्धेत आहेत. पाकिस्तानने सर्वाधिक सामने खेळले आहेत, तर अफगाणिस्तानची फिरकी मजबूत आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .