Suzuki e Access: जपानची कंपनी सुझुकीने नुकतीच भारतीय बाजारात आपली ई-ॲक्सेस (e-Access) इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. विशेष म्हणजे, कंपनी या स्कूटरवर ग्राहकांना तब्बल 20 हजार रुपयांपर्यंतची मोठी सूट देत आहे. जाणून घेऊयात याबद्दल….
सुझुकी आपल्या नव्या ई-ॲक्सेस (E-Access) इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर ग्राहकांना 19,800 रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. यात फायनान्स स्कीम, लॉयल्टी बोनस आणि एक्सटेंडेड वॉरंटीचा समावेश आहे. जास्त किंमतीमुळे स्कूटर घेण्यास कचरणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
25
Suzuki E-Access ची एक्स-शोरूम किंमत
Suzuki E-Access ची एक्स-शोरूम किंमत 1.88 लाख रुपये आहे. ही स्कूटर प्रीमियम सेगमेंटमध्ये येते. 'मेड इन इंडिया' अंतर्गत तयार केलेलं हे मॉडेल देशांतर्गत आणि निर्यातीच्या बाजारपेठेसाठी विकसित केलं आहे. ही स्कूटर पहिल्यांदा 2025 च्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये दाखवण्यात आली होती.
35
स्कूटरचे फीचर्स
या स्कूटरमध्ये 3.07 kWh क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी वापरली आहे, जी जास्त काळ टिकते आणि स्थिर कामगिरी करते. एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर 95 किमीची रेंज देते आणि तिचा टॉप स्पीड ताशी 71 किमी आहे. स्कूटरची इलेक्ट्रिक मोटर 4.1 kW पॉवर आणि 15 Nm टॉर्क जनरेट करते. यात इको राईडसह तीन राईड मोड्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि रिव्हर्स असिस्टसारखे फीचर्सही आहेत.
साध्या चार्जरने 0 ते 80 टक्के चार्जिंगसाठी 4 तास 30 मिनिटं लागतात, तर पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 42 मिनिटं लागतात. फास्ट चार्जिंगच्या सुविधेमुळे फक्त 1 तास 12 मिनिटांत स्कूटर 80 टक्के चार्ज होते. किंमत थोडी जास्त असली तरी, ऑफर्समुळे E-Access एक चांगली आणि दीर्घकाळ टिकणारी गुंतवणूक ठरू शकते.
55
खास लोन स्कीम्स
सुझुकीने इतर कंपन्यांसोबत मिळून खास लोन स्कीम्स आणल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही 9,800 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. व्याजदर 5.99 टक्क्यांपासून सुरू होतो. तुमच्याकडे आधीपासून सुझुकीची गाडी असल्यास, E-Access खरेदीवर तुम्हाला 10 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळेल. म्हणजेच एकूण 19,800 रुपयांची बचत होईल. नवीन ग्राहकांना 7 हजार रुपयांची वेलकम ऑफर दिली जात आहे. याशिवाय, 4 हजार रुपये किमतीची एक्सटेंडेड वॉरंटी मोफत मिळत आहे, जी 7 वर्षे किंवा 80 हजार किलोमीटरपर्यंत लागू असेल.