Electric Scooter Offer : केवळ 28,499 रुपयांत मिळवा इलेक्ट्रिक स्कूटर, फिचर्सही आहेत दमदार!

Published : Sep 11, 2025, 01:00 PM IST

ग्रीन कंपनीची सनी इलेक्ट्रिक स्कूटर २५०W मोटर आणि रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीसह येते, जी ६० किमी मायलेज देते. २५ किमी/तास वेग, ६ महिन्यांची वॉरंटी, अनेक रंगांमध्ये ती उपलब्ध आहे. या स्कूटरची माहिती जाणून घ्या.

PREV
14
स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर

ग्रीन कंपनीची सनी स्कूटर पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय ठरते. ही स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल ६० किमी मायलेज देते. यात २५०W क्षमतेची मोटर आणि रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी असून ती पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त ४ ते ६ तासांचा वेळ लागतो. शहरातील दैनंदिन प्रवासासाठी ही स्कूटर सोयीस्कर, हलकी आणि किफायतशीर ठरेल.

24
स्कूटरवर ऑफर

ग्रीन कंपनीची सनी स्कूटर केवळ मायलेजमध्येच नाही तर फीचर्समध्येही उत्तम आहे. यात आधुनिक LCD डिस्प्ले, मजबूत १० इंचांची चाके आणि टिकाऊ प्नियुमॅटिक टायर्स दिलेले आहेत. दोन प्रवाशांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था असून स्वतंत्र फूटरेस्ट देखील आहे. सुरक्षिततेसाठी विश्वासार्ह ब्रेक सिस्टीम बसवली आहे. यासोबतच कंपनीकडून ६ महिन्यांची वॉरंटीही मिळते. त्यामुळे ही स्कूटर दैनंदिन वापरासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि विश्वासार्ह ठरते.

34
ग्रीन कंपनीची स्कूटर

सनी स्कूटर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्ससह बाजारात उपलब्ध आहे. ही स्कूटर तब्बल ६ रंगांमध्ये मिळते. इच्छुक थेट greenev.life या संकेतस्थळावरून बुकिंग करू शकतात. खरेदीसोबत ७९९ ते १,९९९ रुपयांपर्यंतचे स्क्रॅच कार्ड ऑफर्सही दिल्या जात आहेत. या सर्व सोयींसह सनी स्कूटर फक्त ₹२८,४९९ मध्ये मिळू शकते. पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्टायलिश स्कूटर घेण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.

44
कागदपत्रांची गरज नाही

सनी स्कूटर खरेदी करणे आता अधिक सोपे झाले आहे. ग्राहकांसाठी फक्त ₹२,५८६ EMIची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय ICICI बँकेकडून १ लाख रुपयांपर्यंत कर्जही मिळू शकते. विशेष म्हणजे, यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही, फक्त मोबाईल नंबर पुरेसा आहे. त्यामुळे झंझटमुक्त प्रक्रियेद्वारे आपली स्कूटर सहज बुक करता येते.

Read more Photos on

Recommended Stories