ज्योतिषशास्त्रात प्रत्येक प्राणी, पक्ष्यांबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये चिमणीचाही समावेश आहे. चिमणी दिसल्यास आपल्याला किती लाभ-तोटा होतो याची माहिती येथे दिली आहे.
घरात लहानसे घरटे बांधून चिवचिव करणारी चिमणी (sparrow) आता दुर्मिळ झाली आहे. कुठेतरी एखादी चिमणी दिसणे हेच आता आश्चर्यकारक आहे. ही चिमणी ज्योतिषशास्त्रात (Astrology) महत्त्वाची मानली जाते. वेद, नक्षत्र आणि ग्रहांशी तिचा संबंध आहे. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक पक्ष्याला महत्त्वाचे स्थान आहे. ते आपल्या जीवनाशी जोडलेले आहेत. भविष्याबद्दल ते आपल्याला सूक्ष्म संदेश देतात असे शास्त्रात सांगितले आहे. चिमणी देखील अनेक संकेत देते. चिमणी भाग्य आणि मृत्यूबद्दल संकेत देते. अचानक आपल्यासमोर दिसणारी चिमणी कोणता संदेश देते, कोणत्या वेळी चिमणी दिसणे शुभ असते याची माहिती येथे आहे.
ग्रीक पुराणात (Greek Mythology), चिमणी प्रेमाची देवता अफ्रोडाइटशी संबंधित आहे. येथे चिमणीला कुटुंबातील प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. बायबलमध्ये देखील चिमणीला देवाचे प्रतीक मानले जाते. चिमणी तुमच्या घरात किंवा जवळपास राहत असेल आणि दररोज तुमच्या नजरेस पडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू शकता. फार क्वचित प्रसंगी चिमणी तुमच्या नजरेस पडल्यास जीवनात अनपेक्षित घटना घडतात असा अर्थ होतो.
आर्थिक स्थिती सुधारणा : चिमणी तुमच्या जवळ येताना दिसल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे असा अर्थ होतो. पुढील काळात आर्थिक समृद्धी येईल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होतील. तुमच्या जीवनात संपत्ती येईल याचे हे एक लक्षण आहे.
कष्टाचे संकेत : चिमणी तुमच्या जवळ कशी येते हे येथे महत्त्वाचे आहे. चिमणी जर अस्वस्थ, असमाधानी किंवा वेदनेत असेल तर पुढील काळात तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल असा अर्थ होतो. भविष्यात अनेक कष्ट तुमच्या मागे लागतील असा हा संकेत आहे.
दाम्पत्य जीवनात चढउतार : चिमणी तुम्हाला वारंवार दिसत असेल, विशेषतः विषम संख्येने चिमण्या दिसत असतील तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी नाही असा संकेत आहे. लवकरात लवकर तुमच्या समस्येवर उपाय शोधावा लागेल.
काम अपूर्ण : सर्वसाधारणपणे चिमणी सकाळी दिसते. जर दुपारी किंवा रात्री चिमणी दिसली, विशेषतः विषम संख्येने दिसली तर तुमचे काम अपूर्ण राहील असा अर्थ होतो. चुकीच्या वेळी चिमणी दिसणे शुभ नाही.
चोच उघडलेली चिमणी : चोच उघडलेली चिमणी दिसल्यास तुमचे बिघडलेले काम सुधारेल असा अर्थ होतो. कोणाकडून तरी किंवा अनपेक्षित स्त्रोताकडून तुम्हाला मदत मिळेल असा अर्थ होतो. काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला मदत मिळेल असा हा संकेत आहे.
आरोग्याचे संकेत : चिमणी वारंवार दिसत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय तुमच्या जवळ आली तर ते तुमच्या आरोग्याचे लक्षण असू शकते. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि नियमित तपासणी करावी असा अर्थ होतो.