
(Smartphone market) कॅलिफोर्निया : नवीन वर्षांत ॲपल ब्रँड अनेक नवीन गॅझेट्स बाजारात आणणार आहे. त्यात काही गॅझेट्सच्या अपडेटेड आवृत्त्या असतील तर, आयफोन फोल्डसारखे काही नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जातील, असे सांगण्यात येते. ॲपल ब्रँडच्या प्रॉडक्ट्सची सर्वांनाच प्रतीक्षा असते. याचे ग्राहक दिवसागणिक वाढतच आहेत. आताही आयफोन 17e हा कधी लाँच होतो आणि बाजारात कधी उपलब्ध होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ॲपलचा बजेट-फ्रेंडली म्हणता येईल असा आयफोन 17e स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. विविध माध्यमांच्या वृत्तानुसार, ॲपल आयफोन 17e फेब्रुवारी 2026 मध्ये सादर करेल. आयफोन 16e फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच झाला होता. ॲपलने पूर्वी लाँच केलेल्या आयफोन SE व्हेरिएंटची सुधारित आवृत्ती म्हणून 'e' मॉडेल ओळखले जाते. आयफोन SE दर दोन-तीन वर्षांनी बाजारात येत असे, तर आयफोन 'e' मॉडेल दरवर्षी लाँच करण्याची कंपनीची योजना आहे.
चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरील एका लीकरच्या माहितीनुसार, ॲपलचे असेंबलिंग पार्टनर्स लवकरच आयफोन 17e चे उत्पादन सुरू करतील. आयफोन 17e च्या डिझाइनमध्ये 16e च्या तुलनेत मोठे बदल नसतील. लीक्सनुसार, यात 3.1-इंचाचा आयलँड स्क्रीन आणि सध्याच्या आयफोन 17 लाइनअपमध्ये वापरलेला A19 चिप असेल. ॲपलच्या हाय-एंड स्मार्टफोन्सप्रमाणे, आयफोन 17e मध्ये डायनॅमिक आयलँडचा समावेश केला जाऊ शकतो. बाजारात आयफोन 17e ला कमी किमतीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी स्पर्धा करावी लागेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲपल आयफोन 17e फेब्रुवारीच्या मध्यात सादर करण्याची शक्यता आहे. आयफोन 16e 19 फेब्रुवारी 2025 रोजी लाँच झाला होता. लीक्समध्ये म्हटले आहे की, आयफोन 17e 18 फेब्रुवारीला सादर केला जाऊ शकतो आणि 27 फेब्रुवारीपासून बाजारात उपलब्ध होऊ शकतो. गेल्या वर्षी आयफोन 17e मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या (MWC) आसपास लाँच झाला होता. मात्र, यंदा मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. त्यामुळे, आयफोन 17e या वेळी मार्चमध्ये लाँच झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सॅमसंगची गॅलेक्सी S26 सीरिज देखील येण्याची शक्यता असल्याने, ॲपल त्याचा विचार करूनच आयफोन 17e ची लाँच तारीख अधिकृतपणे जाहीर करेल.