Home Loan : 50 लाखांचे कर्ज लवकर फेडून 30 लाख वाचवा, ही सोपी ट्रिक वापरा

Published : Mar 10, 2026, 09:25 AM IST

Smart Home Loan Strategy Save Lakhs with Mutual Fund SIP : स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण गृहकर्जाचं ओझं न वाटता, कमी वेळेत कर्ज कसं फेडायचं? म्युच्युअल फंड वापरून लाखो रुपयांचं व्याज कसं वाचवता येईल, हे जाणून घेऊया.

PREV
15
गृहकर्ज लवकर फेडू शकता
स्वतःचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकजण १५ ते २० वर्षं EMI भरत राहतात. पण, योग्य आर्थिक नियोजन केलं, तर तुम्ही गृहकर्ज लवकर फेडू शकता आणि मोठा फायदाही मिळवू शकता, असं अर्थतज्ज्ञ सांगतात.
25
इमर्जन्सी फंड किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ
कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या नोकरीच्या सुरक्षेचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आजच्या काळात नोकरी कधीही जाऊ शकते, त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आधीच एक इमर्जन्सी फंड किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार ठेवा. उदाहरणार्थ, ७० लाखांचं घर घ्यायचं असेल, तर आधीच एक कोटी रुपयांचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार असेल, तर भविष्यात नोकरी गेली तरी अडचण येणार नाही.
35
जास्त मुदतीचं (२०-२५ वर्षं) कर्ज घ्या
अनेकजण व्याज कमी लागेल म्हणून १५ वर्षांच्या मुदतीचं कर्ज घेतात. पण तज्ज्ञ सांगतात की, जास्त मुदतीचं (२०-२५ वर्षं) कर्ज घ्या. यामागचं कारण असं की, गृहकर्जाचा व्याजदर साधारणपणे ८.५% ते ९% असतो, जो इतर कर्जांपेक्षा कमी आहे. तुम्ही कमी मुदतीच्या (१५ वर्षं) EMI आणि जास्त मुदतीच्या (२० वर्षं) EMI मधील फरकाची रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली पाहिजे.
45
३२ लाख रुपये जमा होतील
उदाहरणार्थ, ५० लाखांच्या कर्जावर १५ वर्षांचा EMI सुमारे ४९,००० रुपये येतो, तर २० वर्षांचा EMI ४३,००० रुपये येतो. यातील फरक ५,८०० रुपयांचा आहे. ही रक्कम तुम्ही १२% परतावा देणाऱ्या निफ्टी इंडेक्स फंडात (Nifty Index Fund) गुंतवली, तर १५ वर्षांनंतर तुमच्याकडे जवळपास ३२ लाख रुपये जमा होतील. त्या पैशातून तुम्ही उरलेलं कर्ज फेडलंत, तरी तुमच्याकडे ११ लाख रुपये शिल्लक राहतील.
55
जास्त परतावा मिळेल
तुमच्याकडे कर्जाव्यतिरिक्त अतिरिक्त पैसे आले, तर त्यातून कर्ज मुदतीपूर्वी फेडण्याऐवजी ते पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा. यामुळे तुम्हाला जास्त परतावा मिळेल. तसेच, निवृत्तीसाठी (Retirement) जमा केलेला फंड भावनिक होऊन घर खरेदीसाठी वापरू नका, असा सल्लाही अर्थतज्ज्ञ देतात.
Read more Photos on

Recommended Stories