Credit Card Limit : क्रेडिट कार्डची लिमिट वाढावी असं प्रत्येकाला वाटतं. पण लिमिट वाढवण्यासाठी बँका काही गोष्टी विचारात घेतात. त्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.
क्रेडिट कार्ड जास्त वापरल्यास CIBIL स्कोरवर परिणाम होतो. एकूण लिमिटच्या ३०% पेक्षा कमी वापरल्यास स्कोर चांगला राहतो. नियमित वापर आणि वेळेवर परतफेड केल्यास लिमिट वाढते.
25
बिल वेळेवर आणि पूर्ण भरा
क्रेडिट कार्डची पेमेंट कधीही चुकवू नका. छोटी कर्जेही वेळेवर फेडा. फक्त मिनिमम बिल भरल्यास तुमच्या सिबिल स्कोरवर वाईट परिणाम होतो.
35
क्रेडिट युटिलायझेशन कमी ठेवा
फक्त एका कार्डावर नाही, तर तुमच्या सर्व कार्डांच्या एकूण लिमिटवर युटिलायझेशन पाहिले जाते. हे प्रमाण ३०% पेक्षा कमी ठेवा. उदा. तुमची एकूण लिमिट ₹१,००,००० असल्यास, वापर ₹३०,००० पेक्षा कमी ठेवा.
तुमचे उत्पन्न वाढल्यास बँकेला माहिती द्या. पगारवाढ किंवा इतर मार्गांनी वाढलेले उत्पन्न दाखवून लिमिट वाढवण्याची विनंती करा. यासाठी सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, फॉर्म १६ सादर करा.
55
परतफेडीचा रेकॉर्ड चांगला ठेवा
बँका साधारणपणे काही महिन्यांचा तुमचा परतफेडीचा रेकॉर्ड तपासतात. एक-दोन वर्षे वेळेवर पेमेंट केल्यानंतर लिमिट वाढवण्याची विनंती केल्यास ती लवकर मंजूर होते. तसेच, तुमचे सध्याचे युटिलायझेशन कमी असल्यास ऑटो-इंक्रीजची शक्यता असते. फिक्स्ड डिपॉझिट असल्यास, ते दाखवून तुम्ही विशेष लिमिट मिळवू शकता.
हे मुद्देही महत्त्वाचे
बँका तुमचा क्रेडिट इतिहास, उत्पन्नातील स्थिरता, खर्चाची पद्धत आणि EMI किती आहेत हे तपासतात. या सर्व गोष्टी चांगल्या असतील, तर तुमची लिमिट सहज वाढू शकते.