Simple DIY Tricks to Make Your Old Cooler Effective Again : उन्हाळ्यात तुमचा जुना एअर कुलर नीट काम करत नाहीये का? या लेखात आम्ही कुलर स्वच्छ करणे, कुलिंग पॅड बदलणे आणि मोटर दुरुस्त करण्यासारख्या सोप्या टिप्स दिल्या आहेत.
उन्हाळा सुरू झालाय, आता प्रत्येक घरात कुलरची गरज भासणार. अनेकांनी आपले जुने कुलर बाहेर काढायला सुरुवात केली असेल. पण, काही महिने बंद असलेला तुमचा कुलर जुनाट दिसतोय का? तुम्ही नवीन कुलर घेण्याचा विचार करत असाल, तर थांबा! कारण या लेखातील टिप्स तुमच्या जुन्या कुलरला नव्यासारखं बनवण्यासाठी मदत करतील.
27
योग्य स्वच्छता करणे
अनेकदा कुलरमध्ये साचलेल्या घाणीमुळे तो जुनाट दिसू लागतो. अशावेळी त्याची योग्य स्वच्छता करणे आवश्यक आहे. यासाठी, कुलर पूर्णपणे रिकामा करून स्वच्छ करा. टाकीमधील कोणतीही घाण ब्रश किंवा कापडाने काढून टाका आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
37
कुलिंग पॅड्स
तुमच्या कुलरमध्ये कुलिंग पॅड्स असतील, तर ते बदलणे आवश्यक आहे. कुलरची थंड हवा देण्याची क्षमता मुख्यत्वे कुलिंग पॅड्सवर अवलंबून असते. जर पॅड्स खूप जुने झाले असतील किंवा धुळीने भरले असतील, तर हवा थंड होणार नाही.
कुलरमधून हवा कमी येत असेल किंवा जास्त आवाज येत असेल, तर याला मोटर किंवा फॅन कारणीभूत असू शकतो. फॅनची पाती स्वच्छ करा आणि मोटरला थोडे तेल लावा. यामुळे मोटर व्यवस्थित फिरेल आणि कुलरची कार्यक्षमता सुधारेल.
57
पाईप आणि पंप स्वच्छ करा
कुलरमधील पाण्याच्या पंपाची तपासणी करा. पाईपमध्ये घाण किंवा अडथळा असल्यास, पाणी पॅड्सपर्यंत पोहोचणार नाही, ज्यामुळे कुलिंग होणार नाही. त्यामुळे, पाईप आणि पंप स्वच्छ करायला विसरू नका. गरज वाटल्यास, तुम्ही पंप बदलू शकता.
67
गळती थांबवा
टाकी लिक होत असल्यास तुम्ही त्याला चिकणमाती लावू शकता. यामुळे पाण्याची गळती थांबेल. ते अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही त्यावर पेंट देखील करू शकता. कुलरच्या पाण्यात थोडी तुरटी किंवा कडुलिंबाचे तेल मिसळा. यामुळे पाण्याला दुर्गंध येणार नाही.
77
खिडकीजवळ ठेवा
कुलर योग्य ठिकाणी ठेवा. ताजी हवा आत येण्यासाठी कुलर नेहमी खिडकीजवळ किंवा मोकळ्या जागेत ठेवा. कुलर बंद खोलीत ठेवल्यास त्याची थंड हवा देण्याची क्षमता कमी होते.