Scooter Market: कॉलेजला जाणाऱ्या मुलींनो, रोज बस-ऑटोने प्रवास करून वैतागलात का? तुमच्यासाठीच बाजारात काही खास, वजनाने हलक्या स्कूटर्स आहेत. ज्यांची उंची कमी आहे, त्यांच्यासाठी या स्कूटर्स खूपच सोयीस्कर ठरतील.
कॉलेज सुरू झालं की रोजच्या प्रवासाची चिंता सुरू होते. बस आणि रिक्षाची गर्दी, ट्रॅफिकमध्ये अडकणं कुणालाच आवडत नाही. अशावेळी, एक चांगली, वजनाने हलकी आणि बजेटमध्ये बसणारी स्कूटर मुलींसाठी बेस्ट ऑप्शन ठरते. पण ज्यांची उंची कमी आहे, त्यांच्यासाठी मोठी अडचण होते. बाजारातल्या अवजड स्कूटर्स चालवणं म्हणजे एक संकटच. ट्रॅफिकमध्ये किंवा सिग्नलवर थांबताना पाय जमिनीला टेकत नसल्याने तोल जाऊन पडण्याची भीती वाटते. म्हणूनच, आम्ही अशा 5 स्टायलिश आणि बजेट-फ्रेंडली स्कूटर्सची माहिती देत आहोत, ज्या कमी उंचीच्या मुलीही सहज सांभाळू शकतात.
26
TVS Zest: सर्वात हलकी आणि हाताळायला सोपी
तुमची उंची कमी असेल किंवा तुम्हाला जड गाड्या चालवायला भीती वाटत असेल, तर ही स्कूटर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या लिस्टमधील ही सर्वात हलकी आणि कॉम्पॅक्ट स्कूटर आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणीही ती सहज चालवता येते आणि पार्क करता येते. यात समोरच्या बाजूला मोबाईल आणि इतर लहान वस्तू ठेवण्यासाठी एक मोठा ग्लोव्ह बॉक्स (glove box) आहे. सीटची उंची कमी असल्याने, कमी उंचीच्या मुलींचे पायही जमिनीवर सहज पोहोचतात. वजनाने हलकी असली तरी, तिचं 110cc इंजिन खूप शक्तिशाली आहे, जे चांगला पिकअप आणि उत्तम मायलेज देतं. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त ₹67,650 आहे.
36
TVS Jupiter: स्टाईल आणि स्पेसचं परफेक्ट कॉम्बिनेशन
TVS ज्युपिटर तिच्या आकर्षक लूक आणि उत्तम आरामदायी प्रवासासाठी कॉलेजच्या मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. तिचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सीटखाली असलेली मोठी बूट स्पेस. यात तुम्ही कॉलेजची जड बॅग, हेल्मेट आणि महत्त्वाची पुस्तकं सहज ठेवू शकता. यात मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि डिजिटल स्क्रीनसारखे आधुनिक फीचर्सही मिळतात. तिचे मोठे अलॉय व्हील्स खराब रस्त्यांवरही आरामदायक प्रवास देतात आणि इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीममुळे सुरक्षित प्रवासाची खात्री मिळते. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹73,500 आहे.
Honda Activa: अनेक वर्षांचा विश्वास आणि मजबूत बांधणी
तुम्ही तुमच्या पालकांना विचारलं, तर त्यांची पहिली पसंती नेहमी होंडा ॲक्टिव्हाच असेल. याचं मुख्य कारण म्हणजे तिची मजबूत बांधणी आणि अनेक वर्षांचा विश्वास. तिची मजबूत मेटल बॉडी तिला खूप टिकाऊ बनवते. तिच्या नवीन मॉडेल्समध्ये एलईडी हेडलाइट्स, बाहेरून पेट्रोल भरण्याची सोय आणि चावीशिवाय गाडी सुरू करण्यासाठी 'कीलेस' स्मार्ट फीचरसारख्या सुविधाही आहेत. तिचं स्मूथ 110cc इंजिन गर्दीच्या रस्त्यांवरही चांगलं मायलेज देतं आणि तिचं वजन मुली सहज सांभाळू शकतील असं आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत सुमारे ₹76,581 (एक्स-शोरूम) आहे.
56
Yamaha Ray ZR 125 (Hybrid): स्पोर्टी लूक आणि अतिरिक्त मायलेज
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळा, आधुनिक आणि स्पोर्टी लूक आवडत असेल, तर ही यमाहा स्कूटर तुम्हाला पहिल्या नजरेतच आवडेल. तिचं डिझाइन खूपच फॅशनेबल आहे. ही एक हायब्रीड स्कूटर आहे, म्हणजे तिचं इंजिन एका लहान बॅटरीसोबत काम करतं. यामुळे सामान्य स्कूटरपेक्षा 16% जास्त मायलेज आणि चांगला पिकअप मिळतो. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा पर्यायही आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचं पार्किंगचं ठिकाण आणि मायलेज तपासण्यासाठी फोन कनेक्ट करू शकता. तिचं वजन फक्त 99 किलो आहे, ज्यामुळे ती खूपच हलकी वाटते. मात्र, यात रेग्युलर यूएसबी चार्जिंग पोर्ट नाही आणि फूटरेस्ट थोडा लहान आहे. तिची सुरुवातीची किंमत सुमारे ₹78,919 (एक्स-शोरूम) आहे.
66
Hero Destini: कमी किमतीत प्रीमियम आणि पारंपरिक फील
ज्या मुलींना कमी किमतीत, स्टायलिश आणि प्रीमियम दिसणारी 125cc स्कूटर हवी आहे, त्यांच्यासाठी हीरो डेस्टिनी एक उत्तम पर्याय आहे. तिचं रेट्रो-क्लासिक डिझाइन, क्रोम फिनिश आणि सुंदर रंग तुम्हाला कॉलेजमध्ये इतरांपेक्षा वेगळं ठरवतील. तिच्या हाय-एंड मॉडेल्समध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि स्टेप-बाय-स्टेप नेव्हिगेशनसारख्या सुविधाही आहेत. शिवाय, यात हीरोची खास i3S टेक्नॉलॉजी आहे. यामुळे ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर इंजिन आपोआप बंद होतं आणि ॲक्सिलरेटर देताच पुन्हा सुरू होतं, ज्यामुळे पेट्रोलची मोठी बचत होते. तिची सुरुवातीची किंमत सुमारे ₹80,965 (एक्स-शोरूम) आहे.