Scooter Market: Kinetic DX ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 116 किलोमीटरपर्यंत धावते. ही स्कूटर खास करून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सहज चालवता यावी, अशा पद्धतीने डिझाइन केली आहे.
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सातत्याने वाढत आहे. विशेषतः, चालवायला सोप्या आणि जास्त रेंज देणाऱ्या स्कूटर्सची मागणी वाढली आहे. अशातच कायनेटिक कंपनीची नवीन कायनेटिक डीएक्स (Kinetic DX) ही ई-स्कूटर शहरी ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे.
25
किंमत आणि रेंज कशी आहे?
कायनेटिक डीएक्स स्टँडर्ड मॉडेलची किंमत 1,32,597 रुपये आहे, तर डीएक्स प्लस मॉडेल 1,42,622 रुपयांना उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही स्कूटर 116 किलोमीटरपर्यंत धावते आणि तिचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर आहे. यात रेंज, पॉवर आणि टर्बो असे तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत.
35
बॅटरी आणि सुरक्षा वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये 2.6 किलोवॅट क्षमतेची LFP बॅटरी वापरली आहे. ही बॅटरी चार तासांत पूर्ण चार्ज होते आणि तिला IP67 रेटिंग मिळालं आहे. सुरक्षिततेसाठी यात सीबीएस ब्रेकिंग सिस्टीम, पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर यांसारखी फीचर्स आहेत.
यात 8.8 इंचाची डिजिटल स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन, लो-बॅटरी वॉर्निंग यांसारख्या सुविधा आहेत. याशिवाय, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड, हिल असिस्ट आणि अँटी-थेफ्ट सिस्टीम यांसारखे फीचर्सही रायडरच्या सोयीसाठी दिले आहेत.
55
महिलांसाठी ई-स्कूटर
कमी वजन, जास्त स्टोरेज स्पेस आणि चालवायला सोपी असल्यामुळे कायनेटिक डीएक्स ही स्कूटर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजच्या प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय आहे. जे लोक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.