Scooter Market: गेल्या 18 महिन्यांत एका इलेक्ट्रिक स्कूटरने भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. या विक्रमी कामगिरीमागे कोणतं मॉडेल आहे आणि कंपनीने हा टप्पा कसा गाठला, ते जाणून घेऊया.
वाहन विक्रीच्या आकडेवारीनुसार, 25 जून 2026 पर्यंत एथर एनर्जीची एकूण रिटेल विक्री 7,04,447 युनिट्सवर पोहोचली आहे. कंपनीने 2018 मध्ये विक्री सुरू केली होती. सुरुवातीची काही वर्षे हळू वाढ झाली, पण गेल्या 18 महिन्यांत कंपनीने जबरदस्त प्रगती केली आहे. या काळात तब्बल 3.78 लाख स्कूटर्स विकल्या गेल्या आहेत.
24
एथर रिझ्टा स्कूटर
या वेगवान वाढीचं मुख्य कारण म्हणजे एथर रिझ्टा (Ather Rizta) ही फॅमिली स्कूटर. गेल्या 18 महिन्यांतील कंपनीच्या एकूण विक्रीत या मॉडेलचा वाटा तब्बल 54 टक्के आहे. त्याचबरोबर 450S, 450X आणि 450 Apex या मॉडेल्सनाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली, ज्यामुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढण्यास मदत झाली.
34
सर्वाधिक मासिक विक्री
एथरने 2026 मध्येही आपली वाढ कायम ठेवली आहे. कंपनीने जानेवारी ते 25 जून या काळात 1,63,788 इलेक्ट्रिक स्कूटर्स विकल्या आहेत. मार्च 2026 मध्ये तर 36,362 स्कूटर्सची विक्री झाली, जी कंपनीच्या इतिहासातील सर्वाधिक मासिक विक्री ठरली. गेल्या नऊ महिन्यांपैकी आठ महिन्यांत कंपनीने 20,000 पेक्षा जास्त मासिक विक्रीची नोंद केली आहे.
ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो या कंपन्यांनंतर हा टप्पा गाठून एथर एनर्जीने भारतीय ईव्ही बाजारात आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. नवीन उत्पादनं, वाढणारं डीलर नेटवर्क आणि ग्राहकांचा विश्वास या जोरावर कंपनी पुढील काही वर्षांत विक्रीचे आणखी नवीन विक्रम प्रस्थापित करेल, असं ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे.