Saturn Retrograde: शनीची वक्री चाल २७ जुलैपासून मीन राशीत सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या ग्रह बदलामुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या संधी येतील. विशेषतः ४ राशींचं नशीब दुप्पट होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.
वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे मोठा आर्थिक फायदा होईल. कामाच्या ठिकाणी त्यांना चांगली ओळख मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर या काळात चांगल्या संधी चालून येतील. व्यवसायातही नफा होईल आणि उत्पन्न अचानक वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि रखडलेली कामं पूर्ण होतील.
24
मिथुन राशी..
शनीची वक्री चाल मिथुन राशीसाठीही अनुकूल ठरेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात किंवा त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. बॉस आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही वेळ अनुकूल आहे. प्रत्येक कामात यश मिळेल.
34
तूळ राशी..
शनीची वक्री चाल तूळ राशीच्या आयुष्यात भाग्य घेऊन येईल. या काळात या राशीच्या लोकांची संपत्ती दुप्पट होऊ शकते. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसेही या काळात परत मिळतील. तुमच्या आयुष्यातील आव्हानांवर तुम्ही सहज मात करू शकाल.
शनीच्या वक्री चालीमुळे वृश्चिक राशीच्या लोकांचे आयुष्य अचानक सुंदर होईल. त्यांच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल आणि समाजात मान-सन्मान वाढेल. ते ऐषारामाचं जीवन जगतील. या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.