Samsung vs LG Smart TV : सॅमसंग की एलजी? तुमच्या पैशांसाठी कोणता टीव्ही बेस्ट आहे, वाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट

Published : Oct 23, 2026, 02:54 PM IST

नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत आहात? मग सॅमसंग आणि एलजी या दोन टॉप ब्रँड्सपैकी कोणता टीव्ही तुमच्यासाठी बेस्ट ठरेल, यावर टेक तज्ज्ञांनी दिलेला हा सविस्तर रिपोर्ट.

PREV
14
बेस्ट स्मार्ट टीव्ही कोणत्या ब्रँडचा?

तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करताय, तेव्हा सॅमसंग (Samsung) आणि एलजी (LG) ही दोनच नावे सर्वात आधी डोळ्यांसमोर येतात. 'कन्झ्युमर रिपोर्ट्स'ने (Consumer Reports) जाहीर केलेल्या टॉप टीव्ही ब्रँड्सच्या रँकिंगमध्ये या दोन्ही कंपन्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.

विशेष म्हणजे, 2026 सालचा सर्वोत्तम टीव्ही म्हणून Samsung QN65S90F या मॉडेलची निवड झाली आहे. टीव्हीचा डिस्प्ले किती चांगला आहे यासोबतच तो 'स्मार्ट टीव्ही' म्हणून किती भारी काम करतो, हेही खूप महत्त्वाचे असते. सॅमसंग आणि एलजीच्या ऑपरेटिंग सिस्टीम (OS), फीचर्स आणि AI असिस्टंट्सबद्दल टेक तज्ज्ञांचे काय मत आहे, ते आपण पाहूया.

24
स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि युझर एक्सपिरियन्स

सॅमसंग आपल्या टीव्हीमध्ये 'टायझेन' (Tizen) ऑपरेटिंग सिस्टीम वापरते, तर एलजी 'वेबओएस' (webOS) वापरते. या दोन्ही सिस्टीममध्ये तुम्हाला अ‍ॅप्स, रेकमेंडेड व्हिडिओ आणि नुकतेच पाहिलेले शोज दाखवणारे 'टाईल' (Tile) डिझाईन पाहायला मिळते.

डिझाईनची तुलना - टेक रडार (TechRadar) आणि पॉकेट-लिंट (Pocket-lint) या टेक वेबसाईटस्च्या मते, सॅमसंगपेक्षा एलजीची webOS सिस्टीम वापरण्यासाठी थोडी जास्त सोपी आणि चांगली आहे.

सेटिंग्स मेन्यू - पॉकेट-लिंटने दिलेल्या माहितीनुसार, एलजी टीव्हीमध्ये सेटिंग्स पॅनेल स्क्रीनच्या डाव्या बाजूला एका कॉलममध्ये दिसते. यामुळे पिक्चर क्वालिटी बदलताना स्क्रीनवरचा बदल स्पष्ट दिसतो. पण सॅमसंग टीव्हीमध्ये सेटिंग्स विंडो थेट स्क्रीनच्या मध्यभागी येते, ज्यामुळे युझर्सना थोडा त्रास होतो.

34
सॅमसंग बिक्सबी विरुद्ध एलजी थिनक्यू एआय

पूर्वी एलजी टीव्हीमध्ये 'गुगल असिस्टंट' (Google Assistant) इनबिल्ट मिळायचा, त्यामुळे एलजीचा वरचष्मा होता. पण 2025 मध्ये एलजीने ही सेवा बंद केली. आता दोन्ही ब्रँड्स फक्त अ‍ॅमेझॉन अलेक्सा (Amazon Alexa) सपोर्ट देतात.

मायक्रोसॉफ्ट कोपायलट (Microsoft Copilot) - गुगल असिस्टंटला पर्याय म्हणून दोन्ही कंपन्यांनी 'मायक्रोसॉफ्ट कोपायलट' एआय आणले. पण एलजी युझर्सनी याला कडाडून विरोध केला. त्यामुळे डिसेंबर 2025 मध्ये एलजीने हा आयकॉन लपवण्याचा पर्याय दिला. सॅमसंगमध्येही हे एआय फीचर आहे, पण ते सहजासहजी काढता येत नाही, अशी युझर्सची तक्रार आहे.

स्वतःचे एआय असिस्टंट्स - टॉम्स गाईडच्या (Tom's Guide) रिव्ह्यूनुसार, सॅमसंगचा बिक्सबी (Bixby) आणि एलजीचा थिनक्यू एआय (ThinQ AI) युझर्सना फारसे इम्प्रेस करू शकले नाहीत. "आज रात्री टीव्हीवर काय आहे?" अशा साध्या प्रश्नांचीही बिक्सबीला नीट उत्तरे देता आली नाहीत.

44
फायनल व्हर्डिक्ट (अंतिम निकाल)

टेक तज्ज्ञांच्या मते, टीव्हीमध्ये एआय व्हॉईस असिस्टंटपेक्षा त्याची ऑपरेटिंग सिस्टीम (OS) वापरण्यासाठी किती सोपी आहे, यावर टीव्हीची क्वालिटी ठरते. वापरण्याच्या सोपेपणाचा विचार केल्यास एलजीची webOS सिस्टीम थोडी आघाडीवर आहे. पण सॅमसंगची Tizen OS देखील तिला तगडी टक्कर देते आणि ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories