Samsung Galaxy S27 सीरिजचा लूक आणि फीचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नेक्स्ट लेव्हल कॅमेरे, सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि सोनी सेन्सरसह येणाऱ्या S27 सीरिजचे काही खास स्पेसिफिकेशन्स लीक झाले.
आयफोनप्रेमीही होतील फिदा.. सॅमसंग S27 चे सीक्रेट फीचर्स लीक
स्मार्टफोनप्रेमींसाठी सॅमसंग एक मोठी गुड न्यूज देणार आहे. कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S27 (Samsung Galaxy S27) सीरिजबद्दलची गुप्त माहिती आणि सुपर फीचर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. यावेळी सॅमसंग युजर्सना एक नवीन अनुभव देण्यासाठी नेक्स्ट लेव्हल कॅमेरा सेन्सर आणि नवीन बॅटरी टेक्नॉलॉजी आणणार आहे.
26
चार जबरदस्त मॉडेल्स, नेक्स्ट लेव्हल लाइनअप
ॲपल आयफोनप्रमाणेच सॅमसंग आपली लाइनअप अधिक दमदार बनवत आहे. कंपनी 'न्यू मिरॅकल' किंवा 'नेक्स्ट मिरॅकल' या कोडनेमने तब्बल चार स्मार्टफोन तयार करत आहे:
• NM1: गॅलेक्सी S27 (Galaxy S27)
• NM2: गॅलेक्सी S27+ (Galaxy S27+)
• NM3: गॅलेक्सी S27 प्रो (Galaxy S27 Pro)
• NM4: गॅलेक्सी S27 अल्ट्रा (Galaxy S27 Ultra)
S27 प्रो मॉडेलमुळे युजर्सना कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
36
सोनी कॅमेराची जादू: सुपर क्लॅरिटी फोटोज
या सीरिजमधील सर्वात महत्त्वाचा अपग्रेड कॅमेरा विभागात होणार आहे. गॅलेक्सी S27 आणि S27+ या बेस मॉडेल्समध्ये सॅमसंग पहिल्यांदाच सोनीने बनवलेला 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर वापरणार आहे. ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह येणाऱ्या या कॅमेऱ्यामुळे रात्रीच्या वेळीही जबरदस्त आणि शार्प फोटो काढता येतील.
ज्यांना फोटोग्राफीची आवड आहे, त्यांच्यासाठी गॅलेक्सी S27 प्रो आणि S27 अल्ट्रा मॉडेल्स एक ड्रीम फोन ठरू शकतात.
• या दोन्हीमध्ये 50MP सोनी IMX855 अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर असेल.
• 5x ऑप्टिकल झूम असलेला 50MP टेलीफोटो कॅमेरा दूरच्या वस्तूही स्पष्टपणे कॅप्चर करेल.
• S27 अल्ट्रा मॉडेलमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.
56
किलर सेल्फी फीचर्स.. ऑटोफोकस अपग्रेड!
सोशल मीडियाच्या जमान्यात सेल्फीचे महत्त्व लक्षात घेऊन सॅमसंगने फ्रंट कॅमेराही अपग्रेड केला आहे. S27 प्रो आणि S27 अल्ट्रा मॉडेल्समध्ये ऑटोफोकस सपोर्ट असलेला 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामुळे हाय-क्वालिटी व्हिडिओ कॉल्स आणि इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी खूप मदत होईल.
66
सिलिकॉन कार्बन बॅटरी टेक्नॉलॉजी
स्मार्टफोनच्या चार्जिंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी सॅमसंग नवीन सिलिकॉन कार्बन बॅटरी टेक्नॉलॉजी आणत आहे. ही टेक्नॉलॉजी कमी जागेत जास्त बॅटरी बॅकअप देते. यासोबतच उत्तम प्रायव्हसी फीचर्स आणि नेक्स्ट-जनरेशन डिस्प्ले टेक्नॉलॉजी देखील येणार आहे. अंदाजानुसार, ही पॉवरफुल सीरिज 2027 च्या सुरुवातीला अधिकृतपणे लाँच होईल.