Samsung Galaxy S24 वर आश्चर्यकारक सवलत

सॅमसंग Galaxy S25 च्या लाँचिंगच्या निमित्ताने, Amazon वर Samsung Galaxy S24 वर १७,००० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये Galaxy AI वैशिष्ट्य आणि अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आहेत.

स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंग ही एक अग्रगण्य कंपनी आहे. लवकरच सॅमसंग आपल्या Galaxy S सिरीजचा नवीन फोन Samsung Galaxy S25 लाँच करण्याची तयारी करत आहे. नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या निमित्ताने, आधी आलेल्या Samsung Galaxy S24 च्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग मार्केटप्लेस असलेल्या ई-कॉमर्स साइट Amazon ने Samsung Galaxy S24 स्मार्टफोनवर मोठी सवलत जाहीर केली आहे. घरी बसून हा स्मार्टफोन बुक करता येतो. 

सॅमसंग Galaxy S24 च्या मूळ किमतीवर Amazon तब्बल १७,००० रुपयांची सवलत देत आहे हे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. या स्मार्टफोनमध्ये Galaxy AI वैशिष्ट्य देखील समाविष्ट आहे. सॅमसंग Galaxy S24 फोनवरील इतर ऑफर्स आणि वैशिष्ट्यांबद्दलची संपूर्ण माहिती येथे आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S24 स्मार्टफोन Amazon वर ५७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. १२८ GB स्टोरेज असलेला सॅमसंग गॅलेक्सी S24 स्मार्टफोन सुरुवातीला ७४,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता या फोनवर Amazon २३% सवलत देत आहे, ज्यामुळे तो ५७,९९९ रुपयांना ग्राहकांना उपलब्ध आहे. यासोबतच, ग्राहक पंजाब नॅशनल बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास अतिरिक्त १,००० रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय, खरेदीदारांना इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवरही विविध सवलती दिल्या जातात. 

जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास ४०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ही सवलत तुमच्या स्मार्टफोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Samsung Galaxy S24 वैशिष्ट्ये
Samsung Galaxy S24 हा 5G स्मार्टफोन आहे ज्यामध्ये ६.२ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले (मोठा ६.७" FHD+ Dynamic AMOLED 2X), १२०Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट आणि २६०० nits पर्यंतचा ब्राइटनेस आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus 2 देण्यात आले आहे. गॅलेक्सी S24 मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे.

८ GB रॅम मेमरी आणि २५६ GB मेमरी स्टोरेज क्षमता आहे. ड्युअल सिम स्लॉट, ३.१ GHz प्रोसेसर स्पीड, USB Type C कनेक्टर, वॉटर रेसिस्टंट अशी अनेक वैशिष्ट्ये Samsung Galaxy S24 मध्ये आहेत.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, ५०MP ऑप्टिकल सेन्सर रिझोल्यूशन, ८MP रियर फेसिंग कॅमेरा फोटो सेन्सर आणि १०MP फ्रंट कॅमेरा आहे. LED कॅमेरा LED फ्लॅश प्रकार आणि १०x डिजिटल झूम क्षमता आहे. २५ वॅट फास्ट चार्जिंगसह ४७०० mAh बॅटरी आहे. 

Share this article