आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या मित्रांनो... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दरवर्षी आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा करतो. हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या देशात संविधान लागू झाले. लोकांकडून, लोकांसाठी, लोकांचेच राज्य चालवण्याची पद्धत याच दिवशी सुरू झाली. भारत एक स्वतंत्र, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला अनेक हक्क दिले आहेत. जात, धर्म, भाषा, प्रदेश असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान आदर दिला आहे. हीच आपल्या देशाची मोठी ताकद आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. त्या बलिदानाचे स्मरण करून देशाच्या विकासासाठी आपण आपले योगदान दिले पाहिजे. अभ्यासात आणि प्रामाणिकपणात आपणच पुढे राहिले पाहिजे. तोच त्यांना आपण दिलेला खरा सन्मान असेल.
जय हिंद