Jio Rs 15 Plan : रिलायन्स जिओचा धमाका! फक्त १५ रुपयात २४ तास अनलिमिटेड 5G डेटा

Published : Nov 05, 2026, 02:44 PM IST

जिओने फक्त १५ रुपयांचा नवीन अनलिमिटेड 5G डेटा पॅक लाँच केला आहे. याची व्हॅलिडिटी २४ तास आहे. 4K स्ट्रीमिंग आणि गेमिंगसाठी तुम्ही MyJio ॲपवर हा रिचार्ज करू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.

PREV
16
जिओचा अनलिमिटेड डेटा पॅक

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ नेहमीच एक पाऊल पुढे असते. कंपनीने आता आपल्या 5G ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. जे युजर्स रोज भरपूर डेटा वापरतात किंवा ज्यांना घाईघाईत मोठ्या फाईल्स डाऊनलोड करायच्या असतात, त्यांच्यासाठी जिओने फक्त १५ रुपयात हा खऱ्या अर्थाने अनलिमिटेड 5G डेटा पॅक आणला आहे. चला तर मग या प्लॅनची संपूर्ण माहिती आणि फायदे पाहूया.

26
फक्त १५ रुपयांत बरच काही

टेलिकॉम कंपन्या सहसा डेटा पॅकसाठी 1GB किंवा 2GB अशी विशिष्ट मर्यादा देतात. पण जिओचा हा नवीन १५ रुपयांचा पॅक वेगळा आहे. जिओ कोणतीही मर्यादा नसलेला खऱ्या अर्थाने अनलिमिटेड पॅक देत आहे. २४ तासांच्या व्हॅलिडिटीसह तुम्ही हवा तेवढा डेटा वापरू शकता. हा रिचार्ज केल्यावर तुम्हाला २४ तास अखंड हाय-स्पीड 5G इंटरनेट मिळते. महागडे प्लॅन्स न घेता ज्यांना तात्पुरता जास्त डेटा हवा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम आणि खिशाला परवडणारा पर्याय आहे.

36
या पॅकमध्ये नक्की काय?

एकाच दिवसात जास्त इंटरनेट वापरणाऱ्या युजर्ससाठी हा पॅक म्हणजे एक वरदान आहे.

• 4K व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्पोर्ट्स: तुम्ही कोणत्याही बफरिंगशिवाय हाय-क्वालिटी 4K व्हिडिओ आणि लाईव्ह मॅचेसचा आनंद घेऊ शकता.

• ऑनलाईन गेमिंग: मल्टीप्लेअर गेमिंग आणि लॅग-फ्री ऑनलाईन गेम्ससाठी गेमर्सना हा पॅक खूप आवडेल.

• मोठ्या फाईल्स आणि गेमिंग अपडेट्स: तुम्ही मोठे सॉफ्टवेअर अपडेट्स, चित्रपट, HD व्हिडिओ किंवा गेम्स काही सेकंदात डाऊनलोड करू शकता.

• क्लाउड बॅकअप: तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील फोटो, व्हिडिओ आणि कामाचे फोल्डर्स क्लाउड स्टोरेजवर लगेच अपलोड आणि बॅकअप करू शकता.

46
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी बेस्ट

हा प्लॅन फक्त तुमच्या मोबाईलपुरता मर्यादित नाही. तुम्ही प्रवासात किंवा घरी वाय-फाय नसताना मोबाईल हॉटस्पॉटद्वारे लॅपटॉप, टॅबलेट आणि इतर डिव्हाईस कनेक्ट करू शकता. या डेटा पॅकचा वापर करून तुम्ही लॅपटॉपवर ऑफिसचे काम सहज पूर्ण करू शकता, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी होऊ शकता किंवा ऑफिसच्या फाईल्स शेअर करू शकता.

56
या ऑफरच्या अटी

ही सुपर ऑफर मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

१. ग्राहकांकडे 5G सपोर्ट करणारा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.

२. युजर्स जिओ ट्रू 5G नेटवर्क कव्हरेज असलेल्या भागात राहणारे असावेत.

३. युजरच्या सध्याच्या बेस प्लॅनच्या पात्रतेनुसार ही 5G ऑफर लागू होईल, असेही जिओने स्पष्ट केले आहे.

66
असा करा रिचार्ज

हा पॅक आता देशातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये लाईव्ह झाला आहे. युजर्स त्यांच्या आवडीच्या पद्धतीने रिचार्ज करू शकतात.

• MyJio ॲप आणि Jio.com वेबसाईट.

• रिलायन्स रिटेल आणि जनरल ट्रेड रिचार्ज दुकाने.

• थर्ड-पार्टी ऑनलाईन रिचार्ज प्लॅटफॉर्म्स.

• जिओ एंटरप्राईज वेबसाईट.

ज्या लोकांना कमी किंमतीत अनलिमिटेड इंटरनेट हवे आहे, त्यांच्यासाठी हा १५ रुपयांचा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories