Relationship Psychology : नवविवाहितांनो, लग्नानंतरच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा!

Published : Mar 04, 2026, 11:02 PM IST

Relationship Psychology : लग्न म्हणजे दोन जीव, दोन कुटुंब एकत्र येणे. मानसशास्त्र सांगतं की, नव्याने लग्न झालेल्या जोडप्याने सुरुवातीलाच काही गोष्टी समजून घेतल्या, तर त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. चला, तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.

PREV
15
Relationship Psychology
मानसशास्त्रानुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी फक्त प्रेम पुरेसं नाही. त्यासाठी एकमेकांना समजून घेणं, संवाद आणि भावनिक परिपक्वता आवश्यक आहे. मैत्री हा यशस्वी संसाराचा पाया असतो. जोडीदाराच्या आवडी-निवडी, भीती, स्वप्नं आणि छोट्या-छोट्या सवयी जाणून घेणं आणि त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. 'आपण दोघांनी सारखाच विचार करायला हवा' असं समजण्याऐवजी, 'आपण वेगळे असलो तरी एकत्र पुढे कसं जायचं?' याचा विचार करणं जास्त चांगलं आहे.
25
भावना व्यक्त करा

मानसशास्त्रानुसार, भावना मनात दाबून ठेवण्यापेक्षा त्या योग्य शब्दात व्यक्त करायला शिका. 'तू नेहमी असंच करतोस/करतेस' असे आरोप नात्याला कमजोर करतात. नवदाम्पत्याने भांडण जिंकण्यासाठी नव्हे, तर समस्या सोडवण्यासाठी बोलायला हवं. भांडणानंतर एक छोटीशी स्माईल, स्पर्श किंवा 'सॉरी' म्हणणं हे नातं वाचवणारी प्रभावी साधनं आहेत, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.

35
सुरक्षितता आणि स्वीकृती महत्त्वाची
प्रत्येक व्यक्तीला नात्यामध्ये सुरक्षितता आणि स्वीकृती हवी असते. आपला जोडीदार आपल्या भावनांना कमी न लेखता त्या ऐकून घेतो, हे खूप महत्त्वाचं आहे. बाहेरच्या जगाचा कितीही ताण असला तरी घरी आल्यावर शांत राहणं आणि जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालवणं गरजेचं आहे. फोन, टीव्ही बाजूला ठेवून एकमेकांकडे लक्ष देणं, डोळ्यात बघून बोलणं, 'थँक्यू' म्हणणं या गोष्टी छोट्या वाटल्या तरी नातं मजबूत करतात.
45
एकमेकांना प्रोत्साहन देणे
लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं मिलन असलं तरी, प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ, मित्र-मैत्रिणी, छंद आणि करिअरची ध्येयं जपण्याचा हक्क असायला हवा. मानसशास्त्रानुसार, हेल्दी नातं म्हणजे एकमेकांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणं. यामुळे नातं अधिक घट्ट होतं. कुटुंबांमध्ये संतुलन, आर्थिक निर्णयांमधील पारदर्शकता आणि घरातील जबाबदाऱ्यांबद्दल सुरुवातीलाच स्पष्टता ठेवली, तर भविष्यातील वाद टाळता येतात.
55
सामंजस्यपणा गरजेचा

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात समस्या येतात, पण ते त्यांना सामोरे कसे जातात हे महत्त्वाचं आहे. मतभेद होणं स्वाभाविक आहे. माफ करण्याची वृत्ती, चुका मान्य करणं आणि गरज वाटल्यास समुपदेशकांची (Counseling) मदत घेणं ही भावनिक परिपक्वतेची लक्षणं आहेत. प्रेम व्यक्त करणं, एकमेकांचं ऐकणं, आदर करणं, एकत्र हसणं आणि संकटांना मिळून सामोरं जाणं, या गोष्टी नात्यात जीवंतपणा टिकवून ठेवतात, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात.

Read more Photos on

Recommended Stories