Rama Navami Special: श्रीरामनवमीनिमित्त आपण प्रभू रामाचा जन्मदिवस साजरा करतो. याच निमित्ताने, प्रभू रामाची रास कोणती होती आणि त्या राशीच्या लोकांमध्ये रामासारखे गुण येण्याची शक्यता किती असते, हे जाणून घेऊया.
1. अत्यंत संवेदनशील: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो मन आणि भावनांचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीचे लोक खूप संवेदनशील आणि भावनिक असतात. ते इतरांचे दुःख पाहू शकत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा ते मनाने विचार करतात. नात्यांना ते खूप महत्त्व देतात. एकदा का ते एखाद्याशी नाते जोडतात, तर आयुष्यभर ते नातं जपतात. 2. काळजीवाहू आणि संरक्षक: कर्क राशीचे लोक इतरांची खूप काळजी घेतात. ते आपल्या प्रियजनांची प्रेमाने आणि काळजीने देखभाल करतात. त्यांच्या संरक्षणासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते आपल्या कुटुंबाप्रती अत्यंत समर्पित असतात. फक्त जोडीदारच नाही, तर आई-वडील, मित्र, नातेवाईक आणि मुलांचीही ते खूप काळजी घेतात आणि सर्वांशी एकनिष्ठ राहतात.
22
3.कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता..
3. कल्पक आणि सर्जनशील: या राशीचे लोक खूप कल्पनाशक्ती असणारे असतात. अनेकदा ते विचारत हरवलेले दिसतात, पण ते खूप क्रिएटिव्ह विचार करतात. मात्र, त्यांच्या भावना सतत बदलत असतात, ज्यामुळे त्यांच्या आवडीनिवडीही बदलतात. ते अचानक आनंदी होतात, तर अचानक दुःखीही होऊ शकतात. 4. कष्टाळू आणि हुशार: कर्क राशीचे लोक खूप कष्टाळू स्वभावाचे असतात. तसेच ते खूप हुशारही असतात. आपल्या कामाप्रती ते पूर्णपणे वचनबद्ध असतात. पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा, कुठे बचत करायची हे त्यांना चांगलंच माहीत असतं.