South Western Railway Bharti 2025 : दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये सुवर्णसंधी!, 904 ‘ITI अप्रेंटिस’ पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

Published : Jul 16, 2025, 09:15 PM ISTUpdated : Jul 16, 2025, 09:18 PM IST
Railways

सार

South Western Railway Bharti 2025 : दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात ITI अप्रेंटिस पदांसाठी 904 रिक्त जागांवर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 13 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करा.

दक्षिण पश्चिम रेल्वे भरती 2025: रेल्वे मध्ये नोकरी शोधताय? मग ही संधी तुमच्यासाठी आहे! दक्षिण पश्चिम रेल्वे विभागात ITI अप्रेंटिस पदांसाठी तब्बल 904 रिक्त जागांवर भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२५ असून, ही संधी हातची जाऊ देऊ नका!

महत्वाची भरती माहिती:

पदाचे नाव: ITI अप्रेंटिस

एकूण पदसंख्या: 904 जागा

शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण (तपशीलांसाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा)

वयोमर्यादा: किमान 15 वर्षे ते कमाल 24 वर्षे

अर्ज शुल्क: ₹100/- (SC/ST/PWD/महिला उमेदवारांना सवलत लागू)

अर्ज पद्धत: केवळ ऑनलाइन

अर्जाची अंतिम तारीख: १३ ऑगस्ट २०२५

रिक्त पदांचा तपशील:

पदाचे नाव पदसंख्या

ITI अप्रेंटिस 904 जागा

अर्ज कसा कराल?

अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://swr.indianrailways.gov.in/

'Recruitment' किंवा 'Apprentice' विभागात उपलब्ध जाहिरात वाचा.

आपली पात्रता तपासा व ऑनलाईन अर्ज भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

अर्ज सादर करताना शुल्क भरावे.

अर्जाची प्रिंट घेतल्यास भविष्यासाठी उपयोगी ठरेल.

महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:

अर्जामध्ये दिलेली माहिती अचूक आणि पूर्ण असावी.

अपूर्ण अर्ज फेटाळले जातील.

शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

केवळ ऑनलाइन अर्जच मान्य केले जातील.

सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी चुकवू नका! दक्षिण पश्चिम रेल्वेची भरती 2025 तुमच्या करीअरच्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते. आजच अर्ज करा आणि सुरक्षित भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाका.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मोठी बातमी! रेपो रेट घटला! पण तुमचा Home Loan EMI नेमका किती रुपयांनी कमी होणार? ही आकडेवारी तुम्हाला आनंद देईल!
स्वप्न पूर्ण करा! IndiGo मध्ये पायलट व्हायचंय? जाणून घ्या 'करोडो' रुपयांचे पॅकेज, सुविधा आणि नेमका पगार किती?