Racer Bike: TVS ची नवी कॅफे रेसर, तरुणाईमध्ये आहे जबरदस्त क्रेझ! जाणून घ्या अधिक

Published : Mar 25, 2026, 09:21 PM IST

Racer Bike: TVS कंपनीने आपल्या Ronin बाईकवर आधारित एका नव्या कॅफे रेसर बाईकचं डिझाइन पेटंट केलं आहे. ही बाईक रेट्रो आणि स्पोर्टी लूकसह 225cc इंजिनमध्ये येईल अशी अपेक्षा आहे.

PREV
15
नवी कॅफे रेसर बाईक
TVS कंपनी भारतात एक नवी कॅफे रेसर बाईक लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने नुकतंच या बाईकच्या डिझाइनचं पेटंट घेतलं आहे. हे डिझाइन 2024 मध्ये दाखवलेल्या TVS Ronin फॅक्टरी कस्टम मॉडेलसारखं असून, यात रेट्रो आणि स्पोर्टी लूकचं मिश्रण आहे.
25
TVS Ronin वर आधारित
ही नवीन बाईक TVS Ronin वर आधारित असू शकते, असं म्हटलं जातंय. कंपनी 225cc प्लॅटफॉर्मचा वापर करून कॅफे रेसर स्टाईलमध्ये एक नवीन मॉडेल तयार करत असल्याचं या पेटंटमधून स्पष्ट झालं आहे. पण, TVS ने या बाईकच्या लाँचबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
35
क्लासिक डिझाइन
डिझाइनच्या बाबतीत, ही बाईक नेहमीच्या Ronin मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. यात क्लिप-ऑन हँडलबार, पुढे झुकलेली रायडिंग पोझिशन आणि मागे सेट केलेले फूटपेग्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. लहान हेडलाइट फेअरिंग, सिंगल सीट आणि मागच्या बाजूचा काऊल (cowl) या बाईकला क्लासिक कॅफे रेसर लूक देतात.
45
5-स्पीड गिअरबॉक्स
इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, या नवीन बाईकमध्ये Ronin मॉडेलमधील 225cc, ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरलं जाऊ शकतं. हे इंजिन सुमारे 20.4 hp पॉवर आणि 19.9 Nm टॉर्क निर्माण करतं. 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणाऱ्या या बाईकमध्ये परफॉर्मन्सपेक्षा रायडिंग स्टाईल आणि डिझाइनवर जास्त लक्ष दिलेलं असेल.
55
200–250cc सेगमेंटमध्ये एक हटके कॅफे रेसर
ही बाईक बाजारात येईलच याची खात्री नाही. कारण, पेटंट घेतलेली सर्वच डिझाइन्स प्रत्यक्षात लाँच होतातच असं नाही. पण, जर TVS ने ही बाईक लाँच केली, तर 200-250cc सेगमेंटमध्ये हा एक हटके कॅफे रेसर पर्याय ठरेल यात शंका नाही.
Read more Photos on

Recommended Stories