Psychology Tricks: आपण रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो. काही जण लगेच समजतात, तर काहींच्या मनात काय चाललंय हे कळतच नाही. अशावेळी समोरच्या व्यक्तीला खरंच समजून घेणं खूप अवघड असतं. पण या 5 सायकॉलॉजी ट्रिक्स वापरून तुम्ही हे काम सोपं करू शकता.
आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेणं वाटतं तितकं सोपं नाही. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी किंवा बिझनेस पार्टनर, कोणीही असो... त्यांचे विचार, भावना आणि वागणूक आपण योग्यप्रकारे ओळखली, तर नाती अधिक घट्ट होतात. सायकॉलॉजी तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. चला, त्या काय आहेत ते पाहूया.
26
ऐकणाऱ्याच्या वागणुकीकडेही लक्ष द्या
अनेकजण फक्त बोलणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देतात. पण सायकॉलॉजिस्ट सांगतात की, ऐकणाऱ्याच्या वागणुकीकडेही लक्ष द्या. एखादी व्यक्ती तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असेल, डोळ्यात डोळे घालून बघत असेल आणि होकार देत असेल, तर तिला तुमच्याबद्दल आदर आणि उत्सुकता आहे. याउलट, जर ती व्यक्ती फोनमध्ये बघत असेल किंवा इकडेतिकडे पाहत असेल, तर समजा की तिचं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नाही.
36
बॉडी लँग्वेज
शब्दांपेक्षा जास्त, आपली बॉडी लँग्वेज खऱ्या भावना व्यक्त करते. जर एखादी व्यक्ती हात बांधून बोलत असेल, तर ती पूर्णपणे मोकळेपणाने बोलत नाहीये, असं समजू शकतं. याउलट, आरामात बसून, शरीर मोकळं सोडून बोलत असेल, तर ती व्यक्ती कम्फर्टेबल आहे. सायकॉलॉजी संशोधनानुसार, भावना समजून घेण्यात बॉडी लँग्वेज महत्त्वाची भूमिका बजावते.
एखादी व्यक्ती सतत इतरांवर टीका करत असेल किंवा नकारात्मक बोलत असेल, तर तिच्या मनातही तसाच विचार असण्याची शक्यता जास्त असते. याउलट, जे इतरांचे चांगले गुण ओळखून त्यांचं कौतुक करतात, त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. सायकॉलॉजीनुसार, आपण इतरांबद्दल जसं बोलतो, त्यातून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्त्व दिसून येतं.
56
प्रतिसादाची पद्धत
मोठ्या गोष्टींमध्ये प्रत्येकजण चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. पण छोट्या-छोट्या अडचणी, उशीर किंवा अनपेक्षित घटना घडल्यावर त्यांचा खरा स्वभाव समोर येतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर, कामाला उशीर झाल्यावर किंवा एखादी छोटी चूक झाल्यावर ते कसे रिॲक्ट करतात, हे बघा. जे शांत राहतात, त्यांचं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असतं. तर जे लगेच चिडतात, ते तणाव नीट हाताळू शकत नाहीत.
66
प्रश्न विचारण्याची सवय
एखादी व्यक्ती जास्त प्रश्न विचारत असेल, तर तिला नवीन गोष्टी शिकण्याची आणि इतरांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे, असं समजावं. याउलट, जे फक्त स्वतःबद्दलच बोलतात, ते स्वतःच्याच विचारांना जास्त महत्त्व देतात. जे संतुलितपणे बोलतात आणि समोरच्याचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्स असतात. सायकॉलॉजी तज्ज्ञांच्या मते, प्रश्न विचारण्याची पद्धतही व्यक्तीचा स्वभाव समजून घ्यायला मदत करते.