Post Office Scheme: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची (IPPB) ग्रुप ॲक्सिडेंटल गार्ड पॉलिसी सर्वसामान्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या योजनेत तुम्ही रोज फक्त २ रुपये भरून १५ लाखांपर्यंतचा अपघात विमा मिळवू शकता. जाणून घ्या योजनेचे सविस्तर तपशील.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने (IPPB) सर्वसामान्यांना आर्थिक सुरक्षा देणाऱ्या अनेक विमा योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'ग्रुप ॲक्सिडेंटल गार्ड पॉलिसी'. ही योजना लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. शेतकरी, रोजंदारीवर काम करणारे मजूर, ऑटो रिक्षा चालक आणि इतर कामगार या योजनेचा फायदा घेऊ शकतात. अगदी कमी प्रीमियममध्ये जास्त आर्थिक सुरक्षा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
25
दिवसाला फक्त २ रुपये आणि १५ लाखांचे कव्हरेज
या योजनेंतर्गत तुम्ही वर्षाला ७५० रुपये प्रीमियम भरल्यास तुम्हाला १५ लाखांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. याचा अर्थ दिवसाला तुम्हाला फक्त २ रुपये मोजावे लागतील. तसंच ५ लाखांच्या कव्हरेजसाठी वर्षाला ३५० रुपये आणि १० लाखांच्या कव्हरेजसाठी ५५० रुपये असे विविध प्लॅन उपलब्ध आहेत. १८ ते ६५ वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते.
35
कोणते अपघात कव्हर होतात?
या ग्रुप ॲक्सिडेंटल गार्ड पॉलिसीमध्ये फक्त रस्ते अपघातच नव्हे तर इतर अनेक अनपेक्षित घटनाही कव्हर होतात. सर्पदंश, इलेक्ट्रिक शॉक लागणे, बांधकामाधीन इमारतीवरून पडणे अशा अचानक घडणाऱ्या अपघातांसाठी हा विमा लागू होतो. शिवाय अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व आणि कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास संपूर्ण विम्याची रक्कम दिली जाते.
ही पॉलिसी फक्त मृत्यू किंवा अपंगत्वापुरती मर्यादित नाही, तर यामध्ये अनेक वैद्यकीय आणि कौटुंबिक फायदेही मिळतात. अपघाती ओपीडी (OPD) खर्चासाठी ३०,००० रुपयांपर्यंत (प्रति घटना १५०० रुपये) आणि अपघाती इन-पेशंटसाठी ६०,००० रुपयांपर्यंत कव्हरेज मिळते. तसेच कोमात गेल्यास १,००,००० रुपये, हाडे मोडल्यास १,००,००० रुपये आणि कुटुंबाच्या वाहतुकीच्या खर्चासाठी २५,००० रुपयांपर्यंत मदत मिळते.
55
मुलांचे शिक्षण आणि इतर सुविधा
या पॉलिसीमध्ये कुटुंबाला अधिक सुरक्षा देणाऱ्या काही खास अटी आहेत. जास्तीत जास्त दोन मुलांच्या शिक्षणासाठी १,००,००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळतो. अंत्यविधीच्या खर्चासाठी ५,००० रुपये, पोषण किंवा मानसिक आरोग्यासाठी ४ मोफत कन्सल्टेशन आणि अनलिमिटेड टेली-कन्सल्टेशन (OPD) ची सुविधा देखील मिळते. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सेवा सोप्या नोंदणी प्रक्रियेतून आणि फास्ट क्लेम सेटलमेंटद्वारे देते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .