PNB Recruitment 2025 : पदवीधरांना संधी, महिना 90000 पगार, अर्जासाठी शेवटचे 2 दिवस राहिलेत

Published : Nov 21, 2025, 06:27 PM IST

PNB Recruitment 2025 : पंजाब नॅशनल बँकेत देशभरात 750 स्थानिक बँक अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. पदवी आणि एका वर्षाचा बँकिंग अनुभव असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

PREV
14
750 जागांवर भरती, तरुणांनो संधी सोडू नका!

पंजाब नॅशनल बँकेने (PNB) देशभरातील तरुणांसाठी उत्तम संधी आणली आहे. स्थानिक बँक अधिकारी पदासाठी एकूण 750 जागा आहेत. उमेदवाराला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

24
कोणतीही पदवी असलेले अर्ज करू शकतात!

या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. तसेच, बँकेत किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ही सरकारी नोकरी असून अनेक फायदे मिळतात.

34
पगार ऐकून आनंद होईल!

या पदासाठी पगार 48,480 ते 85,920 रुपयांपर्यंत असेल. निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा, भाषा चाचणी आणि मुलाखतीद्वारे होईल. वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे असून आरक्षित वर्गाला सूट आहे.

44
परीक्षा आहे, व्यवस्थित अभ्यास करा!

अर्ज शुल्क SC/ST/PWD साठी 590 रुपये आणि इतरांसाठी 1180 रुपये आहे. PNB च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करा. शेवटची तारीख 23 नोव्हेंबर आहे. परीक्षा डिसेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे.

Read more Photos on

Recommended Stories