PNB LBO Recruitment 2025: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी 750 जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत असून, पदवीधर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
PNB LBO Recruitment 2025: फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे! देशातील अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) ने स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर, प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराच्या नोकरीची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
29
भरतीचा कालावधी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2025 आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा. अधिकृत वेबसाइट: https://pnb.bank.in/Home.aspx
39
रिक्त पदांची माहिती
या भरतीद्वारे पंजाब नॅशनल बँक स्थानिक बँक अधिकारी (LBO) या पदासाठी एकूण 750 रिक्त पदे भरत आहे.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असावा.
वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे (आरक्षित प्रवर्गांना शासकीय नियमांनुसार सूट लागू).
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात PDF नीट वाचणे आवश्यक आहे.
59
पगार आणि वेतनश्रेणी
स्थानिक बँक अधिकारी पदासाठी उमेदवारांना JMGS-I श्रेणीप्रमाणे अंदाजे ₹48,480 ते ₹85,920 इतके मासिक वेतन मिळेल. याशिवाय बँकेचे इतर भत्ते आणि सुविधा लागू राहतील.
69
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे.
लेखी परीक्षा (Online Test)
स्क्रीनिंग प्रक्रिया
भाषा कौशल्य चाचणी (Language Proficiency Test)
मुलाखत (Interview)
79
अर्ज शुल्क (Application Fee)
SC/ST/PwBD उमेदवारांसाठी: ₹59 (GST सह)
इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹1180 (GST सह)
89
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://pnb.bank.in/Home.aspx
Recruitment/Career विभागात जा आणि “PNB LBO Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या सूचना नीट वाचा आणि “Apply Online” वर क्लिक करा.
तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
अर्जातील सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरून अर्ज सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करून ठेवा.
99
का करावी ही संधी साधावी?
पंजाब नॅशनल बँक ही देशातील सर्वात विश्वासार्ह आणि स्थिर बँकांपैकी एक आहे. येथे मिळणारी नोकरी केवळ आर्थिक स्थैर्यच नाही, तर दीर्घकालीन करिअरची उत्कृष्ट संधी देते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .