या राज्यांमधील शेतकऱ्यांना होणार फायदा
कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार, सुरुवातीला हे अभियान अशा राज्यांमध्ये राबवले जाईल जिथे नैसर्गिक शेती आधीच सुरू आहे. यासाठी देशभरात १५,००० क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, केरळ, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात या अभियानाचा लाभ मिळणार आहे.