PM Kisan: ही ५ कामं विसरलात? तर विसराच ₹2000 ची 20वी हप्त्याची रक्कम

Published : Jun 09, 2025, 04:51 PM IST

PM Kisan 20th Installment: देशभरातले करोडो शेतकरी PM किसानच्या 20व्या किस्तची आतुरतेने वाट पाहत आहेत. जूनच्या अखेरीस पैसे येण्याची शक्यता आहे. पण यावेळी असे काही शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची ही मदत येणार नाही. चला जाणून घेऊया का?

PREV
15
1. eKYC नाही केलं तर पैसे नाही येणार
सरकारने स्पष्ट केलंय की ज्या शेतकऱ्यांनी अजून e-KYC पूर्ण केलेलं नाही, त्यांना यावेळेस किस्त मिळणार नाही. PM किसान पोर्टलवर OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे e-KYC करणे अनिवार्य आहे.
25
2. जमिनीची पडताळणी अनिवार्य
तुमच्या जमीन-शेतीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नसेल तर तुमचं नाव PM किसानच्या लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं. प्रत्येक राज्य सरकार जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.
35
3. बँक खाते आधारशी लिंक नाही?
तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची 20वी किस्त अडकू शकते. याआधीही याच कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे व्यवहार रद्द झाले आहेत. लवकरात लवकर आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या.
45
4. चुकीची माहिती दिल्यास पैसे मिळणार नाहीत
ज्या शेतकऱ्यांनी PM किसानसाठी अर्ज करताना चुकीची कागदपत्रे, बनावट आधार किंवा खोटी जमिनीची माहिती दिली आहे, त्यांचा लाभ थेट रोखला जाईल. सरकारने अशा प्रकरणांवर कडक कारवाई सुरू केली आहे.
55
5. पात्र नसाल तर
PM किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांनाच किस्त मिळते. जे शेतकरी अपात्र आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने या योजनेत सामील झाले आहेत, त्यांचे अर्ज तपासणीनंतर रद्द केले जातात. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजनेत सामील झाला असाल तर आधीच तुमचे नाव मागे घ्या. नाहीतर नंतर अडचणी येऊ शकतात.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories