Phone Addiction: काहीही नसताना फोन सारखा का चेक केला जातो? हे आहे खरं कारण!

Published : Jun 24, 2026, 09:21 PM IST

Phone Addiction: अनेक लोकांना काही नोटिफिकेशन किंवा मेसेज आलेला नसतानाही सारखा फोन उचलून चेक करायची सवय असते. पण ही फक्त सवय नाही, तर यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणं आहेत. चला तर मग जाणून घेऊया, आपल्याला सारखा फोन का चेक करावासा वाटतो.

PREV
17
सारखं फोन चेक का करावासा वाटतो?
आजकाल अनेकजण सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी फोन चेक करतात. अनेकदा तर काही नोटिफिकेशन आलेलं नसतानाही स्क्रीनकडे बघत बसतात. आपल्याला इतकं फोन चेक करावंसं का वाटतं? याबद्दल मानसशास्त्रज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊया.
27
नवीन गोष्टींची उत्सुकता
मानसशास्त्रानुसार, आपला मेंदू नेहमी नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. याला 'क्युरिऑसिटी ड्राईव्ह' (Curiosity Drive) म्हणतात. जेव्हा आपल्याला नवीन माहिती मिळते, तेव्हा मेंदूत 'डोपामिन' नावाचं केमिकल तयार होतं. यामुळे आपल्याला छान वाटतं. फोनवर मेसेज, लाईक किंवा कमेंट आल्यावर हाच आनंद मिळतो आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी आपण सारखा फोन चेक करतो.
37
अनिश्चिततेमुळे...
दुसरं महत्त्वाचं कारण आहे 'व्हेरिअबल् रिवॉर्ड सिस्टीम' (Variable Reward System). हे एक असं मानसशास्त्रीय तत्त्व आहे जे आपल्या वागणुकीवर परिणाम करतं. प्रत्येक वेळी फोन उचलल्यावर काहीतरी इंटरेस्टिंग मिळेलच असं नाही. पण कधीतरी एखादा महत्त्वाचा मेसेज किंवा चांगला व्हिडीओ दिसतो. याच अनिश्चिततेमुळे, 'यावेळी नक्कीच काहीतरी खास असेल' असं आपल्या मेंदूला वाटतं आणि आपण पुन्हा फोन चेक करतो.
47
मागे पडण्याची भीती
आपले मित्र किंवा सहकारी एखाद्या नवीन विषयावर बोलत असतील आणि आपल्याला त्याबद्दल काहीच माहीत नसेल, तर आपण मागे पडल्यासारखं वाटतं. यालाच 'FOMO' (Fear of Missing Out) म्हणतात. त्यामुळेच आपण सतत सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप चेक करत राहतो. महत्त्वाची माहिती सुटून जाईल, ही भीती आपल्याला फोनच्या अधिक जवळ नेते.
57
ॲप्सचा प्रभाव
अनेक ॲप्सची रचना आपल्या मानसिकतेला डोळ्यासमोर ठेवूनच केलेली असते. नोटिफिकेशन्सचे रंग, स्क्रोल करण्याची पद्धत, लाईक्स-कमेंट्सची सिस्टीम, या सगळ्या गोष्टी युझर्सनी जास्त वेळ घालवावा यासाठीच बनवलेल्या असतात. विशेषतः लाल रंगाचे नोटिफिकेशन आपलं लक्ष लगेच वेधून घेतात. थोडा रिकामा वेळ मिळाला की नकळतपणे फोन उचलला जातो आणि हीच गोष्ट सवयीची होऊन जाते.
67
एकटेपणामुळे...
मानसिक तणाव, एकटेपणा किंवा कंटाळा आल्यावरही आपण फोनचा आधार घेतो. कारण फोन आपलं लक्ष तात्पुरतं समस्यांवरून हटवतो. सोशल मीडिया, व्हिडीओ किंवा गेम्स काही वेळासाठी आपलं मनोरंजन करतात. यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. पण हळूहळू ही सवय फोनशिवाय राहू न शकण्याच्या व्यसनात बदलते.
77
फोनचा वापर कमी करण्यासाठी...
तज्ज्ञांच्या मते, फोन वापरणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करणे, सोशल मीडियासाठी ठराविक वेळ ठरवणे, झोपण्यापूर्वी फोन दूर ठेवणे यांसारख्या छोट्या बदलांनी चांगला फरक पडतो. तसेच, पुस्तकं वाचणे, व्यायाम करणे किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे यांसारख्या गोष्टी फोनवरील अवलंबित्व कमी करतात.
Read more Photos on

Recommended Stories