PF Transfer Online Tips: जेव्हा तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा पीएफ बॅलन्स नवीन कंपनीच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर करणे महत्त्वाचे असते. असे न केल्यास, तुमचे जुने आणि नवीन पीएफ खाते वेगवेगळे राहतील.
UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेले मेंबर आयडी एकाच EPF खात्याशी जोडण्यास मदत करतो. यामुळे सर्व पीएफ खाती एकाच ठिकाणाहून मॅनेज करता येतात.
28
पीएफ ट्रान्सफर का गरजेचं आहे?
नोकरी सोडल्यावर तुमचा पीएफ आपोआप नवीन कंपनीच्या खात्यात जात नाही. ट्रान्सफर न केल्यास, जुनी आणि नवीन खाती वेगळी राहतील. यामुळे पेन्शन आणि रिटायरमेंटच्या फायद्यांवर परिणाम होऊ शकतो.
38
पीएफ ऑनलाइन ट्रान्सफरसाठी आवश्यक अटी
जुना आणि नवीन मेंबर आयडी (पीएफ खाते क्रमांक) EPFO डेटाबेसमध्ये उपलब्ध असावा. तुमच्या कंपनीचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट EPFO मध्ये नोंदणीकृत असावे.
'ऑनलाइन सर्व्हिसेस' मध्ये 'वन मेंबर, वन ईपीएफ अकाउंट' निवडा.
'गेट डिटेल्स' वर क्लिक करून जुन्या कंपनीचे तपशील मिळवा.
OTP टाकून सबमिट करा.
फॉर्म 13 प्रिंट करून कंपनीला द्या.
58
पीएफ ट्रान्सफर झाले की नाही, कसे तपासावे?
युनिफाइड पोर्टलवर 'व्ह्यू' मध्ये जाऊन 'पासबुक' वर क्लिक करा.
UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.
पीएफ ट्रान्सफर झाला असेल, तर नवीन खात्यात क्रेडिट एंट्री दिसेल.
68
पीएफ ऑनलाइन ट्रान्सफर स्टेटस कसे तपासावे?
e-SEWA पोर्टलवर 'ट्रॅक क्लेम स्टेटस' वर क्लिक करा.
सबमिशननंतर स्टेटस 'Pending with employer' दिसेल.
कंपनीने स्वीकारल्यावर स्टेटस 'Accepted by the employer' असे दिसेल.
78
पीएफ ट्रान्सफरसाठी मागील नोकरीची एक्झिट डेट का गरजेची आहे?
ऑनलाइन ट्रान्सफरसाठी मागील नोकरीची एक्झिट डेट अपडेट करणे अनिवार्य आहे. ही डेट नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनी अपडेट करता येते. ही ती तारीख असावी, जेव्हा कंपनीने शेवटचे योगदान दिले होते.
88
पीएफ ट्रान्सफर झाला, पण पेन्शन नाही, मग काय करावे?
पेन्शनची गणना तुमच्या नोकरीचा कालावधी आणि शेवटच्या पगारावर अवलंबून असते. पीएफ ट्रान्सफर केल्याने फक्त तुमची मागील नोकरीची नोंद लिंक होते. यामुळे तुम्ही भविष्यात पेन्शनसाठी पात्र राहता.