पेट्रोल पंपावर १५ ऑक्टोबरपासून २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट करण्यावर एक नवा नियम लागू होणार आहे. पण यासाठी लागणारा ५ रुपयांचा चार्ज ग्राहकांना द्यावा लागेल का? पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
१५ ऑक्टोबर २०२६ पासून पेट्रोल पंपावर UPI पेमेंटचे नियम बदलणार आहेत. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मर्चंट पेमेंटवर आता नवीन चार्जिंग सिस्टीम लागू होईल. सामान्य व्यावसायिक व्यवहारांवर ०.४ टक्के चार्ज असतो, पण इंधनासाठी २००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास ५ रुपये फिक्स चार्ज आकारला जाईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा ५ रुपयांचा भुर्दंड ग्राहकांवर पडणार नाही. हा चार्ज मर्चंटला म्हणजेच पेट्रोल पंप चालकाला द्यावा लागेल. ग्राहकांना UPI पेमेंटसाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार नाही. २००० रुपयांच्या आतील व्यवहारांवर हा चार्ज नसेल. तसेच, वैयक्तिक बँक खात्यांमधील थेट व्यवहारांवरही हा नियम लागू होणार नाही.
25
अन्यथा UPI स्वीकारणं बंद करू
सेंट्रल मुंबई पेट्रोल डीलर्स असोसिएशनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि अर्थ मंत्रालयाकडे या चार्जमधून पूर्ण सूट देण्याची मागणी केली आहे. या नव्या नियमातून पेट्रोल पंपांना वगळले नाही, तर १५ ऑक्टोबरपासून २००० रुपये आणि त्यापुढील UPI पेमेंट स्वीकारणे बंद करू, असा इशारा असोसिएशनने दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत आधीच नफा कमी असतो, त्यात प्रत्येक UPI पेमेंटवर मर्चंट चार्ज द्यावा लागल्यास मोठा आर्थिक फटका बसेल, असे डीलर्सचे म्हणणे आहे. हा चार्ज तेल कंपन्यांनी भरावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
35
इंधन विक्रेते चिंतेत
हा प्रश्न फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही, तर मध्य प्रदेशातही हीच परिस्थिती आहे. २००० रुपयांवरील UPI पेमेंटवर लागणारा चार्ज मागे घेतला नाही, तर १६ ऑक्टोबरपासून राज्यातील ४,७०० पेट्रोल पंपांवर असे व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत, असे तिथल्या पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. अनेक भागांतील इंधन विक्रेते या नव्या चार्जबाबत चिंता व्यक्त करत आहेत. पण देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर एकाच दिवशी UPI सेवा बंद होईल, असे आताच सांगता येणार नाही. प्रत्येक राज्यातील डीलर्स असोसिएशनचा निर्णय, सरकारचे पुढचे पाऊल आणि तेल कंपन्यांसोबतच्या चर्चेवर पुढील परिस्थिती अवलंबून असेल.
या सगळ्याचा ग्राहकांवर थेट काय परिणाम होईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याच्या नियमानुसार, २००० रुपयांपेक्षा जास्त UPI पेमेंट करणाऱ्या ग्राहकाकडून ५ रुपये अतिरिक्त घेतले जाणार नाहीत. ते ५ रुपये मर्चंटला द्यावे लागतील. पण जर एखाद्या पेट्रोल पंप मालकाने हा नवा चार्ज देण्यास नकार दिला आणि २००० रुपयांवरील UPI पेमेंट घेणे बंद केले, तर ग्राहकांना पेमेंटसाठी दुसरा पर्याय शोधावा लागेल. जे लोक एकाच वेळी जास्त रकमेचे पेट्रोल किंवा डिझेल भरतात, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. २००० रुपयांपेक्षा कमी रकमेचे UPI व्यवहार पूर्वीसारखेच मोफत राहतील. हा नवा मर्चंट चार्ज म्हणजे सरकारने लावलेला टॅक्स नाही, हे लक्षात घ्या.
55
सरकार काय निर्णय घेणार महत्त्वाचं ठरणार
त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून पेट्रोल पंपावर UPI पेमेंट करता येणार नाही किंवा २००० रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास ग्राहकांकडून ५ रुपये कापले जातील, असा समज करून घेणे चुकीचे आहे. मुळात हे ५ रुपये इंधनाच्या व्यावसायिक व्यवहारांवर मर्चंटला लागणारा चार्ज आहे. काही पेट्रोल डीलर्स असोसिएशनने याला विरोध करत हा खर्च परवडणार नसल्याचे म्हटले आहे. योग्य तो बदल न झाल्यास मोठ्या रकमेचे UPI व्यवहार थांबवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपूर्वी सरकार, RBI, तेल कंपन्या आणि पेट्रोल विक्रेते यांच्यात होणाऱ्या चर्चेतून काय निर्णय निघतो, यावर अंतिम चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत ग्राहकांनी UPI सोडून फक्त कॅश वापरण्याची कोणतीही गरज नाही.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .