सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, नाहीतर १ जानेवारीपासून PAN कार्ड होणार निष्क्रिय

Published : Dec 22, 2025, 06:57 PM IST

How To Link PAN With Aadhaar Online : सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे, जी चुकवल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. यामुळे आयकर रिटर्न भरणे, बँक व्यवहार आणि कर्ज घेण्यासारख्या अनेक आर्थिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. 

PREV
15
उरलेत फक्त 8 दिवस!

आजच ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर १ जानेवारीपासून तुमची अनेक सरकारी व आर्थिक कामे अडकू शकतात. इतकंच नाही तर विविध योजनांचा लाभही मिळणार नाही. आजच्या काळात आधार आणि पॅन कार्ड ही अत्यावश्यक कागदपत्रे बनली आहेत. बँक खाते उघडणे, आयकर भरणे, कर्ज घेणे किंवा कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करायचा असेल, तर पॅन कार्डशिवाय पर्याय नाही. मात्र, जर तुमचे पॅन कार्ड अद्याप आधारशी लिंक नसेल, तर आता वेळ फारच कमी उरली आहे. 

25
सरकारचा स्पष्ट इशारा

सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास, १ जानेवारी २०२६ पासून पॅन कार्ड निष्क्रिय (Inactive) करण्यात येईल. एकदा पॅन कार्ड बंद झाले, की ते पुन्हा सुरू करणे सोपे राहणार नाही. नव्याने प्रक्रिया करावी लागू शकते आणि दंडही भरावा लागेल. 

35
PAN कार्ड बंद झाल्यास काय अडचणी येतील?

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर तुमचे अनेक दैनंदिन व्यवहार थांबू शकतात, उदा.

आयकर रिटर्न दाखल करता येणार नाही

बँकेत नवीन खाते उघडता येणार नाही

कर्ज (Loan) घेण्यात अडथळे येतील

क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी

शेअर बाजार व म्युच्युअल फंड व्यवहार ठप्प होऊ शकतात 

45
PAN–Aadhaar लिंक कसं कराल? (घरबसल्या, काही मिनिटांत)

यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा लॅपटॉपवरून हे काम सहज करता येते.

प्रक्रिया:

इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जा – incometax.gov.in

Home Page वरील Quick Links मध्ये Link Aadhaar वर क्लिक करा

PAN नंबर आणि Aadhaar नंबर टाका

मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा

SMS द्वारेही लिंक करता येते, पण ऑनलाइन पद्धत अधिक सोपी आणि सुरक्षित आहे. 

55
डेडलाईन चुकवली तर किती दंड?

जर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत लिंकिंग केलं नाही आणि पॅन कार्ड निष्क्रिय झालं, तर

पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1,000 रुपये दंड भरावा लागेल

दंड भरल्यानंतर पॅन पुन्हा सुरू होण्यासाठी 7 ते 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो

म्हणूनच, शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच हे महत्त्वाचे काम पूर्ण करा, असा सल्ला दिला जात आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories