Orkut Comeback : 90 च्या दशकातील मुलांचा लाडका 'ऑर्कुट' पुन्हा येतोय?

Published : Oct 09, 2026, 05:33 PM IST
Orkut Comeback : 90 च्या दशकातील मुलांचा लाडका 'ऑर्कुट' पुन्हा येतोय?

सार

२००० च्या दशकात धुमाकूळ घालणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ऑर्कुट' पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या खोट्या जगावर टीका करत, ऑर्कुटचे संस्थापक ऑर्कुट बुयुकोकटेन यांनी एक खुलं पत्र लिहून ही माहिती दिली आहे.

मुंबई : २००० च्या दशकाच्या सुरुवातीला इंटरनेटवर धुमाकूळ घालणारं 'ऑर्कुट' हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा परतत आहे. संस्थापक ऑर्कुट बुयुकोकटेन हे जुन्या काळाप्रमाणेच मैत्री, कम्युनिटी आणि माणसांमधल्या खऱ्या नात्यांना प्राधान्य देत ऑर्कुट पुन्हा आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी इंटरनेट युजर्सचा पाठिंबा मागितला आहे. मात्र, हे नवीन प्लॅटफॉर्म नक्की कधी लाँच होणार, याची तारीख त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.

'सोशल मीडिया भरकटलाय': संस्थापकाचं खुलं पत्र

त्यांनी ऑर्कुटच्या अधिकृत वेबसाईटवर एक खुलं पत्र प्रसिद्ध करून हे प्लॅटफॉर्म पुन्हा आणण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. त्यांनी या पत्रात गेल्या दोन दशकांत सोशल मीडियामध्ये झालेल्या बदलांवर सडकून टीका केली आहे. आजचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स खऱ्या नात्यांपेक्षा युजर्सचं लक्ष वेधून घेण्यावर जास्त भर देतात, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पत्रात त्या काळाची आठवण करून दिली, जेव्हा इंटरनेटवर माणुसकी जिवंत होती. ते म्हणाले की, तेव्हा दुसऱ्या खंडात राहणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज येणं एखाद्या जादूसारखं वाटायचं. तो आनंद थोड्या वेळासाठी असला तरी तो खरा असायचा. पण आजचा सोशल मीडिया खऱ्या नात्यांऐवजी अल्गोरिदमवर चालतो. त्यामुळेच आजची पिढी प्रचंड चिंता आणि एकटेपणाचा सामना करत आहे, यात काहीच नवल नाही, असंही ते म्हणाले.

'ऑर्कुट' हे गुगलच्या मालकीचं सुरुवातीच्या काळातलं सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म होतं, जे गुगलचे इंजिनिअर ऑर्कुट बुयुकोकटेन यांनी तयार केलं होतं. जानेवारी २००४ मध्ये ते सुरू झालं होतं. भारत आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये ऑर्कुटला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. प्रोफाईल्स, कम्युनिटीज आणि टेस्टिमोनियल्सच्या माध्यमातून लोक एकमेकांशी जोडले गेले होते. पण फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या इतर सोशल मीडिया साईट्सची लोकप्रियता वाढल्यामुळे, गुगलने सप्टेंबर २०१४ मध्ये ऑर्कुट पूर्णपणे बंद केलं. आता तब्बल १० वर्षांनंतर ऑर्कुट पुन्हा एकदा नव्या रूपात येण्याची शक्यता आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी