हा लाँचिंग इव्हेंट वनप्लसच्या वेबसाइट, Amazon India आणि अधिकृत सोशल मीडियावर थेट प्रसारित करण्यात आला.
वनप्लसचे हे नवे डिव्हाइसेस मिड-रेंज व प्रीमियम सेगमेंटला लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहेत. भारतातील पोको (Poco), आयकू (iQOO), मोटोरोला (Motorola) यांसारख्या ब्रँड्सना या लाँचने मोठे आव्हान मिळणार आहे.
OnePlus Nord 5, प्रीमियम सेगमेंटसाठी नवा प्रतिस्पर्धी
वनप्लस नॉर्ड ५ मध्ये 4nm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर वापरण्यात आला असून, यात LPDDR5X RAM, Snapdragon Elite Gaming, आणि hardware-accelerated real-time ray tracing यासारखी उच्च दर्जाची फीचर्स असणार आहेत. यामुळे गेमिंग, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हा फोन जबरदस्त ठरण्याची शक्यता आहे.
कॅमेरा सेटअप:
पाठीमागे: ५० MP Sony Lyt-700 सेन्सरसह मुख्य कॅमेरा
समोर: ५० MP JN5 सेन्सर
डिस्प्ले:
6.8 इंच OLED स्क्रीन, 144 Hz रिफ्रेश रेट – गेमिंग व व्हिज्युअल्ससाठी उत्तम अनुभव.
बॅटरी आणि चार्जिंग:
6,500 mAh पेक्षा अधिक बॅटरी
80W फास्ट चार्जर बॉक्समध्ये
या फीचर्समुळे नॉर्ड ५ हा ₹३०,००० हून अधिक किंमतीच्या प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च होणार असल्याचे संकेत आहेत.